आवाज कोकणचा / नवी मुंबई 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान: नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा...



वार्ताहर -  पूजा चव्हाण 

उरण, ५ मार्च - हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने राज्याचा महसूल विभाग मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा लाभ सर्व सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिलांसाठी महसूल विभागाच्या १५ सेवा देण्यात येणार आहेत.

तहसीलदार उद्धव कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या अभियानातर्गत मंडळ, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रात ६ विशेष अभियान दिवस आयोजीत करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना सातबारा, दाखले आणि इतर सुविधा त्यांचे द्वारी त्यांचे गावात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


शिबीराचे दिनांक आणि ठिकाण

- ७ मार्च २०२६: चाणजे सजा, ग्रामपंचायत कार्यालय चाणजे

- १४ मार्च २०२६: जासई, लोकनेते दिबा पाटील सभागृह जासई

- १० एप्रिल २०२६: कोप्रोली, रा.जि.प. शाळा कोप्रोली

- १७ एप्रिल २०२६: वेश्वी सजा, हनुमान मंदिर वेश्वि

- ८ मे २०२६: उरण सजा, उरण एज्युकेशन सोसायटी उरण

- १५ मे २०२६: म्हातवली, उरण एज्युकेशन सोसायटी उरण

नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार उद्धव कदम यांनी केले आहे.

Comments

Popular Posts