आवाज कोकणचा / नवी मुंबई
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे उलवे पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचा सन्मान.....
पत्रकारितेसह सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील उलवे पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज सन्मान करण्यात आला.
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश सचिव एडवोकेट दिव्या लोकरे, नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू, नवी मुंबई कार्याध्यक्ष वर्षा लोकरे, सदस्य श्वेता तांडेल व रेश्मा कडू यांच्या हस्ते उलवे पोलीस ठाण्यातील पी. आय . अश्विनी पाटील , पी. आय. भारती पिचड, पोलीस हवालदार रोहिणी जाधव , पोलीस हवालदार वृषाली मोकल , पोलीस हवालदार जयश्री पवार , पोलीस हवालदार जानवी गावित , पोलीस नाईक अनिता डोंगरे , पोलीस नाईक सुवर्णा बोचरे , पोलीस शिपाई सुप्रिया शेलार , पोलीस शिपाई सारिका पाटोले, पोलीस शिपाई आरती गुरव , पोलीस शिपाई रेश्मा जाधव , पोलीस शिपाई लता रजपूत या उपस्थित पोलिस भगिनींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस इन्स्पेक्टर भारती पाटील यांनी समितीच्या या कार्याबद्दल अभिनंदन केले व महिला उत्कर्ष समिती अनेक सामाजिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय राहून पोलिसांना सुद्धा मदत करत असतात याबद्दल आभार मानले.
.jpg)




Comments
Post a Comment