आवाज कोकणचा नवी मुंबई
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा निषेध, भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याच्या आश्रयदात्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी....
पूजा चव्हाण
उरण, 28 मार्च 2026 - अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने उरण शहरातील गांधी चौकात निदर्शने करून भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याच्या राजकीय आश्रयदात्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अशोक खरात हा नाशिक मधील स्वयंघोषीत भोंदू बाबा आहे ज्याचे नवनवीन कारनामे उघडकीला येत आहेत. त्याने निर्माण केलेल्या मंदिर व ट्रस्टच्या नावाखाली १०५ कोटी रुपयांचा निधी शासनाचे विविध विभागाने वळविला आहे. सोबतच ४८ कि.मी. लांबीची स्वतंत्र जलवाहिनी व एक लाख क्षमता असलेली पाण्याची टाकी बनवून दिली आहे.
संघटनेची मागणी आहे की अशोक खरात व त्याच्या आश्रयदात्यांना कठोर शिक्षा करावी, त्याच्याशी संबंधीत सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी, पिडीत नागरीकांना न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, पिडीत महिलांना अभय देवून त्यांना बोलते करावे व त्यांचे योग्य असे समुपदेशनाची व्यवस्था करावी.
मागण्या:
1. अशोक खरात व त्याच्या आश्रयदात्यांना कठोर शिक्षा करावी.
2. त्याच्याशी संबंधीत सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.
3. पिडीत नागरीकांना न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी.
4. पिडीत महिलांना अभय देवून त्यांना बोलते करावे व त्यांचे योग्य असे समुपदेशनाची व्यवस्था करावी.
5. या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येक राजकीय, प्रशासकीय व सामाजिक पुढा-यांची सर्व स्तरावरील नावे जाहीर करुन त्यांच्यावर सुध्दा कठोर कारवाई करावी.




Comments
Post a Comment