आवाज कोकणचा / उरण
एल निनो जनजागृतीपर शिवार फेरीचे चिरनेर येथे आयोजन ...
सचिन घबाडी / चिरनेर
तालुका कृषी अधिकारी, उरण यांच्या कार्यक्षेत्रातील मौजे चिरनेर, ता. उरण, जि. रायगड येथे दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता खरीप हंगामपूर्व तयारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी एल निनो जनजागृतीपर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एल निनो परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची माहिती देणे तसेच त्यावरील योग्य उपाययोजना, पिक निवड, पाणी व्यवस्थापन व जोखीम कमी करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा होता.
या शिवार फेरीच्या नियोजनासाठी व मार्गदर्शनासाठी मा. श्री. शिवाजी आमले (विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे), मा. श्री. बालाजी ताटे (विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी), मा. श्रीमती वंदना शिंदे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड) व मा. श्री. सुनील निंबाळकर (उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या शिवार फेरीस श्रीमती अर्चना सुळ नारनवर (तालुका कृषी अधिकारी, उरण), मंडळ कृषी अधिकारी श्री. शुभम गटकळ तसेच उप कृषी अधिकारी श्रीमती अलका बुरकूल यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना खालील बाबींवर मार्गदर्शन केले:
एल निनो परिस्थितीत पिकांची निवड व पीक व्यवस्थापन
कमी पावसाच्या परिस्थितीत पाणी बचत व सूक्ष्म सिंचन तंत्र हवामानानुसार शेती नियोजन सुधारित वाणांचा वापर आणि जोखीम व्यवस्थापन तसेच गावातील पोलीस पाटील श्री. संजय पाटील व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. प्रफुल्ल खारपाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
सहाय्यक कृषी अधिकारी श्री. एस. जी. घरत (सजा कोप्रोली), गावातील महिला शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
या शिवार फेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये एल निनो व हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण होऊन बदलत्या परिस्थितीत शाश्वत शेती करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती एस. बी. गायकवाड (सहाय्यक कृषी अधिकारी, चिरनेर) यांनी उत्कृष्टरीत्या केले.







Comments
Post a Comment