आवाज कोकणचा नवी मुंबई
सौंदर्य तज्ञ रेखा पाटील शृंगार ज्योत पुरस्काराने सन्मानित ..
प्रतिनिधी / पनवेल
13 मे 2026
पत्रकार उत्कर्ष समिती आयोजित दहावा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित केला होता.
यावेळी रायगड व नवी मुंबईतील महिलांचे विशेष आकर्षण असलेल्या सौंदर्यतज्ञ सौ रेखा पाटील यांना समितीतर्फे पंचज्योत पुरस्कारा अंतर्गत शृंगार ज्योत या सन्मानाने गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना रेखा पाटील यांनी महिलांनी आपल्या त्वचेची काळजी घेणे यासोबतच अधिक सुंदर दिसण्यासाठी केवळ मेकअप उपयोगी नसून आजच्या धकाधकीच्या जीवनात अधिक सजग राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.




Comments
Post a Comment