आवाज कोकणचा / रत्नागिरी
कुंभार्लीचे सुपुत्र लान्स नायक जितेश कोलगे मातृभूमीच्या सेवेतून निवृत्त...
चिपळूण/ संतोष कोलगे
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावचे सुपुत्र लान्स नायक जितेश हेमंत कोलगे हे १७ वर्ष मातृभूमीची सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांची कुंभार्ली येथे भव्य मिरवणूक काढून गाव आणि वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच रवींद्र सकपाळ, उपसरपंच संदीप भाई कोलगे, माजी उपसरपंच अजिंक्य कोलगे, माजी उपसरपंच दिनेश लब्दे, बीजेपी चे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष वसंत ताम्हणकर, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई उपाध्यक्ष संतोष कोलगे, तंटामुक्ती माजी अध्यक्ष प्रसाद कोलगे, बाबा कोलगे, नरेश भाई कोलगे, राजाभाऊ नारकर, सत्यवान भाऊ कोलगे, बाळू जाधव. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते व या सर्वांनी त्यांना निवृत्तेतर आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मातृभूमी व देशसेवेच्या कार्याचा गाव व वाडी यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केलेल्या या निवृत्ती सोहळ्याविषयी लान्स नायक जितेश कोलगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली व देशातील जास्तीत जास्त युवकांनी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे म्हटले.




Comments
Post a Comment