Posts

Showing posts from October, 2024
Image
रणांगण दिवाळी अंक .... राजकारणाचं सुरू असलेलं अधःपतन, भोवताली वाढत असलेला चंगळवाद, समाजातून हरपत चाललेला संवाद आणि संवेदनशीलता, अशा अस्वस्थ वर्तमानावर विचारमंथन करणारा रणांगण दिवाळी अंक   'कारण-राजकारण' हा विषय घेऊन आकाराला आला आहे. प्रकाश अकोलकर, उल्का महाजन, प्रसन्न जोशी, दिनेश गुणे, संजय परब, अशा अनेक जाणकारांनी राजकारणाच्या आणि समाजाच्या ढासळलेल्या स्थितीवर कटाक्ष टाकणारं लेखन केलं आहे. त्यामधून आरक्षण, भटक्या विमुक्यांचे प्रश्न, माध्यमांमधला जातीवाद असे अनेक विषय प्रतलावर आणले गेले आहेत.दीपा पवार,वैभव छाया, अमोल कुलकर्णी, महेंद्र नाईक डॉ. अमोल अन्नदाते  आणि कौस्तुभ जोशी  यांचे विविध विषयावरील लेख आहेत. रुचकर कविता आणि खमंग कथांच्या विभागासोबत 'रणांगण'ने विविध डॉक्टरांच्या आरोग्यविषयक चर्चेचा विभाग सादर केलाय. वेधक मांडणी आणि खुसखुशीत रेखाचित्रांनी नटलेला, राजकारण आणि समाजकारणातील मर्म मांडू पाहणारा दिवाळी अंक - रणांगण  संपादक - डॉ. अविनाश गारगोटे अतिथी संपादक - प्रशांत ननावरे कार्यकारी संपादक - डॉ. श्रीधर नाईक  रणांगण दिवाळी अंक 2024 पृष्ठसंख्या - 200 मूल्य...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातर्फे उरण विभगामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालन पूजा चव्हाण/ उरण सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.विशाल नेहूल व उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  औद्योगिक सुरक्षा बलाचे ( सीआयएसएफ ) १ पोलिस निरीक्षक , २ पोलिस  उपनिरीक्षक यांच्यासह ५० जवान तसेच उरण पोलिस ठाणे यांचे १ पोलिस निरीक्षक,५ सहाय्यक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक,२० अंमलदार यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी संचालन केले.   उरण १९० - विधानसभा मतदार संघातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रे, व संवेदनशील परिसरात काल २५ ऑक्टोबर रोजी जासई गाव ते रांजनपाडा रिक्षा स्टॅन्ड,, नव्याने उदयास येत असलेल्या द्रोणागिरी नोड वसाहत, नवीनशेवा, उरण एसटी स्टॅन्ड, चारफाटा ते राजपाल नाका, जरी मरी मंदिर, उरण बाजारपेठ, मस्जिद मोहल्ला, वाणी आळी, स्वामी विवेकानंद चौक, बोरी व उरण न्यायालय रोड येथे संचालन करण्यात आले. 
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई  पनवेल/ प्रतिनिधी  अपना दल’ पक्षाचे संस्थापक डॉ. सोनेलाल पटेल यांच्या  पुण्यतिथी निमित्त आदरांजली ; केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची प्रमुख उपस्थिती उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय राजकारणी राहिलेले तसेच अपना दल या राजकीय पक्षाचे संस्थापक शेतकरी पीडित शोषित वंचित यांचे कैवारी डॉ. सोनेलाल पटेल यांचा पुण्यतिथी कार्यक्रम गुरवारी पनवेलमधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात झाला. या कार्यक्रमाला आरोग्य व कुटूंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल उपस्थित राहून  त्यांनी डॉ. सोनेलाल पटेल  यांना अभिवादन केले.  यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कार्यक्रमाचे संयोजक व पॅनेसिया हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.  सुभाष सिंह, पत्नी संतोष सिंग , शरद गुप्ता, हेमंत इंदप, संजय तांडेल, भारत टोपले, योगेश तांडेल, गुरुनाथ राणे यांच्यासह पेनिसिया हॉस्पिटल चा कर्मचारी वर्ग सहसंयोजक डॉ.  अशोक सिंह, ब्रिजेश पटेल,  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.       
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई  पूजा चव्हाण  दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांची ६९ वी जयंती  साजरी......... रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे दिवंगत जेष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे साहेब यांची ६९ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त अनेक नेते मंडळी यांनी या कार्यक्रमात शाम म्हात्रे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  तसेच शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी २८ सप्टेंबर रोजी विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले होते. त्या स्पर्धांचे बक्षीस समारंभ ६ ऑक्टोबर रोजी शाम म्हात्रे साहेब यांच्या जयंतीदिनी करण्यात आले त्यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक नियती पाटील , हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरदा स्वप्नील उपाध्ये काव्य लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनिता सुधीर राजदेव,पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अरुणा चिरपे,चित्रकला स्पर्धेमध्ये कशिष गणेश तिखे तसेच वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रेखा भूषण घारे आणि एकपात्री - दविपा...

खारघरमध्ये मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्घाटन.

Image
खारघरमध्ये मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्घाटन.     खा रघरवासियांना मालमत्ता कर भरणे होणार सोपे पनवेल, दि. १: पनवेल महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने आज दिनांक १ऑक्टोबर रोजी खारघर मधील केंद्रीय विहार जवळील प्राईड ईमारतीच्या तळमजल्यावर मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्घाटन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे, सहायक आयुक्त स्वरूप खारगे, प्रभाग अधिकारी स्मिता काळे, प्रभारी कर अधिक्षक सुनील भोईर, महेश गायकवाड, प्रभारी अधिक्षक जितेंद्र मढवी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  मालमत्तांधारकांच्या बिलांमधील अडचणी लक्षात घेऊन, त्या सोडविण्यावरती महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने भर दिला आहे. नागरिकांना कर भरणे सोपे जावे, त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये दुरूस्ती  व्हावी, तक्रारींचे निवारण लवकर व्हावे तसेच महापालिका मुख्यालयात येण्या जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने हे मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे.  मालमत्ता कर भरण्याची सु...