
आवाज कोकणचा / प्रतिनिधी २४ एप्रील 22 / प्रतीनिधी ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पत्रकार उत्कर्ष समितीची पालघर कार्यकारिणी निवड विषयी ची सभा संपन्न... ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पत्रकार उत्कर्ष समितिच्या पालघर जिल्हा निवड बाबत चर्चा करण्यासाठी पालघर येथे समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर येथे सभा संपन्न झाली . या सभेमध्ये संस्थेची कार्ये व कामाविषयीची माहिती तसेच भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेचे उत्कृष्ट नियोजन माननीय राजेश संखे यांच्या कार्यालयात करण्यात आली होती. यावेळी अमेया लीमये, संजोग संखे , परेश संखे , उज्वला जगताप, जितेंद्र सावे, राजेश साळुंखे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. लवकरच समितीच्या पालघर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याचे श्री सुधीर पाटील यांनी सांगितले.