
आवाज कोकणचा / पनवेल प्रतिनिधि - अशोक घरत बुद्ध पौर्णिमा निमित्त कोन गावी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. मेड प्युअर सोशल वेलफेअर फाऊंडेशन तसेच लाईफ केअर हॉस्पिटल कर्जत संयुक्त विद्यमाने कोन गाव (पनवेल) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ता.२३ रोजी गावच्या बुद्ध विहार मध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आलेल्या मान्यवरांपैकी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच सविता कैलास म्हात्रे आणि त्यांचे यजमान कैलास म्हात्रे तसेच डॉ.सचिन सोनावणे सर यांच्या शुभहस्ते बुद्ध पूजा करण्यात आली.त्यानंतर त्रीसरण वंदना सर्वांनी मिळून केली. शिबिरामध्ये समीक्षा महाडिक मॅडम यांनी हॉस्पिटलची माहिती आणि संजना कांबळे मॅडम यांनी आपल्या फाऊंडेशनची माहिती दिली. "मेडप्युअर सोशल वेल्फेअर फाउंडेशनची" स्थापना जुलै २०२३ रोजी झाली.या फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात.तसेच अनाथाश्रम, वृद्धाश्रम मधील लोकांना सुद्धा साहित्य वाटप करत असतात. फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी १००० झाडे लावून,ती झाडे जगवण्याचे उपक्रम हाती घेतले आहे.प्र...