Posts

Showing posts from January, 2022
Image
आवाज कोकणचा / अशोक म्हात्रे दिनाक 24 जानेवारी 22  महीला उत्कर्ष समिती कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे रक्तदान करण्याचे तालुका अध्यक्ष दिपा ताटे यांचे आवाहन पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष माननीय दीपा ताटे यांच्या पुढाकाराने कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  सध्या कोरोना ची परिस्थिती हळूहळू सामान्य होत  असली तरीही मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे.  याकरिता मानव सेवेच्या दृष्टिकोनातून कुडाळ तालुका अध्यक्ष माननीय सौ. दिपा ताटे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय सौ. ज्योतिका हरयान , माननीय सौ. नेहा परब ,  माननिय सौ. सुप्रिया वालावलकर , माननिय सौ. तन्वी सावंत  यांनी पुढाकार घेत शासकीय जिल्हा रुग्णालय सिंधुदूर्ग यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे . जिल्ह्यातील सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण रक्तदान करून मानवसेवे  प्रती आपले योगदान द्यावे.याकरिता समितीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करून  नाव नोंदविण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 
Image
  तंबाखू मुक्त शाळा अभियानात उरण तालुक्यातून पहिली तंबाखू मुक्त शाळा म्हणुन रा.जि. प.प्राथ.शाळा मोठीजुई शाळेला मिळाला बहुमान... 22 जानेवारी /अशोक म्हात्रे तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत पंचायत समिती उरण शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन व आसान सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या 10 फेब्रुवारी 2021 च्या निर्णयानुसार तंबाखूमुक्त शाळेसाठी नवीन निकष सांगण्यात आले होते. ते निकष कसे अपलोड करावेत, कोण कोणते उपक्रम राबवावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानुसार उरण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री अंजने साहेब,सर्व अधिकारी वर्ग, सलाम मुंबई जिल्हा समन्वयक श्री संदेश देवरूखकर सर, प्रकल्प समन्वयक श्री.आदेश नांदवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मोठीजुई या शाळेने विविध उपक्रम राबवून तसेच तंबाखू मुक्त शाळा, परिसर, गाव व घर कसे करता येईल तंबाखूचे दुष्परिणाम, याबाबतचे मार्गदर्शन, तंबाखू मुक्तीची शपथ, १०० यार्ड परिसरातील सर्व दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थ न  विकण्याचे निवेदन देऊन शासनाचे ...
आवाज कोकणचा / नवी मुंबई दि. 22 जानेवारी 22 / अशोक म्हात्रे ➖➖➖➖➖➖➖➖➖ ‘संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार – २०२२ करिता प्रस्ताव सदर करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका व संत शिरोमणी रोहिदास समन्वय समितीचे ‘’संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार – २०२२ करिता प्रस्ताव सदर करण्याचे आवाहन. मुंबई, शुक्रवार : जागतिक कीर्तीचे मानवतेचा संदेश देणारे विज्ञानवादी विचारांचे संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांच्या ६४६ व्या जयंती निमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या ‘’संत रोहिदास समाजभूषण पुरस्कार – २०२२ ‘’ करिता चर्मकार समाजबांधवांकडून माहितीसह प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका व संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या संत रोहिदास जयंती सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते समाजातील १० व्यक्तींना त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्रिडा, आर्थिक विकास तसेच चर्मकारांच्या उन्नती करिता झटलेल्या समाजबांधवाच्या कार्याचा गौरव करीता त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्म...
Image
  प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न. उरण दि 19(विठ्ठल  ममताबादे ) जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था पनवेल व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. केअर ऑफ नेचर रॉक ऍनिमल पार्क वेश्वि एकविरा डोंगर येथे प्राण्याच्या पुतळ्यांचे उदघाटन, रानसई येथे दोन रुग्णवाहिकेचे लोकार्पण, आय लव्ह रानसई नावाचे लोकार्पण,150 आदिवासी लोकांना ई श्रम कार्ड पॉलिसी वाटप, आदिवासी आश्रम शाळा चिरनेर येथे आदिवासी मुलांना मोफत कराटे क्लासेसची सुरवात आदि विविध सामाजिक उपक्रम विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उरणमध्ये राबविण्यात आले. यावेळी उद्योजक महेश मारुतीराव पवार व महिला सामाजिक कार्यकर्ते संगीता सचिन ढेरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा रायगड भूषण राजू मुंबईकर,डाबर कंपनीचे मॅनेजर रमेश मारुतीराव पवार,श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यत...
Image
 दिनांक: 6 जानेवारी 22 पत्रकार उत्कर्ष समिती च्या वतीने उरण येथील विश्रामगृहात पत्रकार दिन उत्साहात साजरा   दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती सोहळा अर्थात पत्रकारदिन  शासकीय विश्रामगृह उरण येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.  दीप प्रज्वलन महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष  डॉ. स्मिता पाटील, रायगड अध्यक्षा रेखा घरत, उरण अध्यक्षा निर्मला पाटील, सीमा घरत , आवाज कोकणचा कार्यकारी संपादक आरती पाटील या पंचज्योतीच्या हस्ते झाली. यानंतर गणेश वंदन गीत अलंकार भोईर यांनी सादर केले. यानंतर प्रस्तावना पत्रकार उत्कर्ष समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी केली. यावेळी त्यांनी समितीच्या सामाजिक कार्य, पत्रकारांसाठी सामाजिक कार्य, त्यांना विमा संरक्षण, गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत आणि यापुढील कार्याचे उद्दिष्ट सांगितले. पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनीही आपल्या कार्याचे वेगवेगळ्या स्तरावरची माहिती दिली. पत्रकारांवर होणारे अन्याय, समाजामध्ये होणारे अन्याय, महिलांवर होणारे अन्याय, यांना वाचा फोडता याव...