Posts

Showing posts from April, 2024
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि सिडको डंपिंग ग्राउंडच्या प्रदूषणामुळे जनजीवन व निसर्ग चक्र धोक्यात मानवी  जीवनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता ... महाराष्ट्र शासनाचे नवी मुंबई शहर वसवण्यासाठी व विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने 1970 ला रायगड, ठाणे जिल्ह्यातील हजारो एकर जमिनी संपादित केल्या व त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आणले .  तळोजा एमआयडीसी विभागात नवी मुंबई वसावण्यासाठी मोलाची भूमिका निभावणाऱ्या सिडकोने सुंदर शहराची संकल्पना मांडून शहर बसविले.  परंतु या शहराचा निघणारा कचरा विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा एम. आय.डी.सी. विभागातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट शेजारी आणला जातो. या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया न केल्यामुळे या भागात नेहमी दुर्गंधी पसरलेली असते.  तसेच या भागात  मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीसह कैराव केमोफॉर्ब, वेदांत डायस्टफ यासारख्या अनेक कारखाने व वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले आहेत .  या कारखान्यामधून निघणारा विषारी धूर, केमिकल युक्त सांडपाणी , कंपन्यातून निघणारे दुर्गंधीयुक्त वास यामुळे घोट कॅम्प घोट कोयना वेळे, सिद्धी करवले, तळोजे मजकूर, भो...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई उरण/पुजा चव्हाण शुल्लक वादावरून एकाचा खून ! चार   संशयीत पोलिसांच्या ताब्यात         या घटने मधील फिर्यादी शाहरुक हुसेन खान वय वर्ष 20 रहाणार संघर्ष नगर झोपडपट्टी मोरारोड भवरा ता.उरण,जि. रायगड व त्याचा मित्र मयत रौफ अकबर खान व आन्य एक मित्र हे जेएनपीटी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या कंटेनर ट्रेलर मधून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेया परिसरात आले असता रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेलेल्या ट्रेलर चालका सोबत झालेल्या वादवदीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने या भानगडीत रौफ अकबर खान याला जीव गविण्यची वेळ आली. झालेल्या मारहाणीत लथबुक्याने जबर मारहाण केल्याने व ट्रेलर चालकाने डोक्यावर लकडी दांडा मारल्याने गंभीर स्वरूपी जखमी झालेल्या रौफ अकबर खान याचा उपचार दरम्यान मुंबई येथील सायन रुग्णालयात मृत्यू झाला.या घटने मुळे जेएनपीटी परीसरांतील ट्रेलर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.       या घटने बाबत पोलिस सूत्रांकडून देण्यात आलेल्या महितीनुसार शाहरुक हुसेन खान, रौफ अकबर खान व त्यांचा एक मित्र जेएनपीटी परिसरात उभ्या असणार्...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि महापे येथे श्री राम जन्मोत्सव उत्साहात संपन्न उपस्थितांनी घेतला ह. भ. प. श्री पांडुरंग महाराज भोईर यांच्या कीर्तनाचा लाभ  आयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठानेमुळे यंदा सर्वत्र श्री राम नवमीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्त नवी मुंबईतील महापे येथील श्री राम मंदिरात दर्शन, किर्तन, जन्मोत्सव व महाप्रसादाचे आयोजन केले होते. महापे येथील श्री रामांचे हे मंदिर खूप जुने असून मागील ३२ वर्षांपासून येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वर्गीय श्री अमृत पाटील यांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या ५ मुलांनी आजही एकत्रितपणे त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. राम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे पहाटेपासून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यात सहभागी होतात. गेल्या २५ वर्षांपासून पारमार्थिक व कौटुंबिक गुरुवर्य हभप पांडुरंग महाराज भोईर (आळंदी) यांचे न चुकता हरकीर्तन या ठिकाणी श्री राम नवमीच्या दिवशी आयोजित केले जाते. गेल्या काही वर्षांपासून  या कार्यक्रमाध्...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई उरण प्रतिनिधि / पूजा चव्हाण उरण तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती मोठया उत्साहात साजरी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२४ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे अध्यक्ष संजय गायकवाड, उरण आमदार महेश बालदी, उरण मुख्याधिकारी समीर जाधव, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम, मोरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक इंगोले, कामगार नेते रमेश ठाकूर ,  कौशिक शाह, रवी भोईर, जैवीन कोळी, राष्ट्रवादी प्रशांत पाटील, राष्ट्रवादी संतोष घरत, राष्ट्रवादी भावना घाणेकर, चिंतामण गायकवाड, सीमा घरत, यशवंत ठाकूर, रोहित पाटील, अमृत शेठ, भूपेन घरत, नंदकुमार पाटील, संदेश ठाकूर मनसे, धनेश बोरे मनसे, उरण तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष घनःश्याम कडू , जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरु तसेच दि उरण तालुका बार असोशिएशन चे अध्यक्ष ॲड विजय पाटील, ज्येष्ठ अधिवक्ता आणि माजी अध्यक्ष ॲड पराग म्हात्रे, खजिन...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि दिनांक 14 एप्रिल 2024 पत्रकार उत्कर्ष समिती व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन... पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या सदस्य व पदाधिकारी तसेच समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन केले. पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील , पेण सदस्य अमोल येरणकर, रायगड अध्यक्ष श्री. सुनील भोईर यांच्यासह इतर सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. महिला उत्कर्ष समिती कार्याध्यक्ष श्रुती उरणकर यांनी तसेच नवी मुंबई तुर्भे विभाग अध्यक्ष वंदना अंबवले, उपाध्यक्ष राणी दळवी, सचिव रेखा पंडित, सदस्य सुवर्णा मस्के , मंजुषा कानडे, सत्यशिला काकडे,  वैभववाडी अध्यक्ष रश्मी रावराणे , पुणे अध्यक्षा ज्योती गायकवाड यांनी आपापल्या विभागात महामानवाला अभिवादन केले.
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र पदाधिकारी निवड जाहीर.. . श्रीमती बारकुबाई पाटील विद्यालय रोडपाली पनवेल येथे  पत्रकार उत्कर्ष समितीच्या सदस्यांची सभा संपन्न झाली . अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार  शैलेश ठाकूर यांच्यासह उपस्थीत सर्वांच्या सहमतीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.   यावेळी अस्तित्वात असलेल्या जुन्या सर्व कमिटी बरखास्त करण्यात आल्या तसेच ज्यांच्या ओळखपत्राची मुदत संपलेली असुन हि कार्डचा वापर करत असेल तर तो गुन्हा आहे त्या संदर्भात नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे  . यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीची भविष्यातील कार्यप्रणाली वर्षा सहल, विद्यार्थी सन्मान सोहळा, पदाधिकारी निवड, ओळखपत्राचे  नूतनीकरण याबद्दल  विस्तृत चर्चा करण्यात आली .पत्रकारिता करत असताना ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाबरोबर आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात ठेऊन  अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. जिथे अन्याय होतो तिथे मदतीसाठी आवाज उठविण्याचे  कार्य पत्रकार उत...
Image
आवाज कोकणचा / लोणावळा श्री एकवीरा पालखी मंडळांची नियोजन बैठक  लोणावळा पोलीस ठाणे येथे संपन् श्री जयेंद्र दादा खुणे यांची प्रमूख उपस्थिती....   लोणावळा (प्रतिनिधी) : श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट वेहेरगाव आयोजित चैत्र सप्तमी सोमवार दि.१५ एप्रिल २०२४ रोजी या मुख्य दिवशी कार्ला गडावर होणाऱ्या आई श्री एकवीरा देवी पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असून दि. १४ ते १६ एप्रिल या दरम्यान देवीची यात्रा आहे. यात्रेला आगरी, कोळी, कराडी, कुणबी, सी.के.पी. व इतर समाजातील लाखो भक्त व भाविक दर्शनासाठी येतात. पालखी व यात्रेचे औचित्यसाधून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व एकविरा पालखी मंडळे व मंडळाचे प्रमुख यांची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.  नियोजन बैठक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे बैठक संपन्न झाली. एकविरा भक्त श्री .जयेंद्रदादा खुणे यांनी श्री. किशोर धुमाळ साहेब ( वपोनी) यांचा सर्वांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार...
Image
 आवाज कोकणचा नवी मुंबई प्रतिनिधि पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सौ.श्रुती सतिश उरणकर राज्यस्तरीय ”राजमाता जिजाऊ” गौरव पुरस्काराने सन्मानित जनजागृती सेवा संस्था(रजि.) या सामाजिक संस्थेच्यावतीने ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बदलापूर येथील माहेरवाशीण संस्थेच्या प्रांगणात राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध प्रतिभावंत महिलांचा गौरव करण्यात आला. सतत समाजसेवेचा ध्यास असणा-या, समाजासाठी असामान्य कामगिरी करणा-या ७५ हुन अधिक पुरस्कार प्राप्त रणरागीणी श्रुती उरणकर या पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.  जनजागृती सेवा संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महानगर विकास कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.अमितकुमार गोविलकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ”राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार” समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. श्रुती उरणकर या नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवल...
Image
आवाज कोकणचा / सिंधुदूर्ग प्रतिनिधि पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर याना चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने नृत्य सन्मान विशेष पुरस्कार कुडाळ येथे प्रदान .. नृत्य क्षेत्रातील गेल्या २० वर्षातील भरीव कामगिरीची दखल           नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली 'चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ' या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे सुपूत्र पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या नृत्य कार्यक्रम आयोजक व नियोजक प्रमुख, नृत्य परीक्षक, नृत्य विश्लेषण आदी नृत्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा सुप्रसिद्ध रंगकर्मी तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ठाकूर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.                नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला अवार्ड शो म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण सोहळा मराठा समाज हॉल कुडाळ येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार शेखर स...