Posts

Showing posts from August, 2023
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई संवाददाता ( अशोक म्हात्रे ) डॉ. धर्मेन्द्र दुबे को एमिनेंट वैज्ञानिक पुरस्कार               सोसाइटी ऑफ एकेडमिक रिसर्च फॉर रूरल डेवलपमेंट के द्वार शिक्षा के क्षेत्र छत्रपति शिवाजी महाराज इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के प्रिंसिपल डॉ. धर्मेंद्र दुबे को एमिनेंट वैज्ञानिक पुरस्कार से सम्मानित किया गया।  डॉ. दुबे को इस पहले भी भारत शिक्षा रत्न, उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार आदि से भी नवाजा जा चुका है। डॉ. धर्मेंद्र दुबे ऑपरेशन रिसर्च सोसाइटी ऑफ इंडिया के काउंसिल मेंबर भी चुने गए हैं। डॉ. धर्मेंद्र दुबे को शिक्षा और ग्रामीण विकास से जुड़े उनके कार्यों के कारण इस पुरस्कार से सम्मानित किया गया था. डॉ. धर्मेंद्र दुबे इंटरनेशनल एसोसिएशन ऑफ इंजीनियर्स, इंडियन साइंस कांग्रेस, ऑपरेशन रिसर्च सोसाइटी ऑफ इंडिया आदि के सदस्य हैं।
Image
  आवाज कोकणचा / कुडाळ प्रतिनीधी / अशोक म्हात्रे  महिला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्षा सौ. दीपा ताटे यांचे सहकाऱ्यांसह ओरस येथे रक्षाबंधन              पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष सौ. दीपा ताटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह समाजात शांतता सुरक्षा व कायदा सुस्थितीत राहण्यासाठी नेहमी कर्तव्य तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात पार पाडला. ओरोस येथील पोलीस ठाण्यामध्ये महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकारी व सचिव तन्वी सावंत, सदस्य रूपाली वरक, सुप्रिया वालावलकर, सुस्मिता राणे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठिकाण ओरोस येथील पोलीस ठाण्यामधील पोलीस जवानांना राख्या बांधून आपली संस्कृती जपली.          अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते.         
Image
आवाज कोकणचा / वैभववाडी प्रतिनीधी ( अशोक म्हात्रे ) महिला उत्कर्ष समिती वैभववाडी तालुक्याच्या वतीने वैभववाडी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वैभववाडी तालुका उपाध्यक्षा सुमित्रा साळुंखे यांच्यासह सहकारी पदाधिकारी व सदस्या अक्षता साळुंखे, अश्विनी साळुंखे, छाया साळुंखे ,पूर्वा गायकवाड ,नेहा रावराणे ,अंकिता साळुंखे, वेदिका साळुंखे, वैष्णवी जठार या भगिनींनी बहिण भावाच्या पवित्र नात्याचा व भावाकडून सुरक्षेची हमी देणारा रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न झाला. वैभववाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व जवानांना राखी बांधून सर्वांनी या सणाचे महत्त्व जपले. पोलीस जवान हे नेहमीच समाजात शांतता व सुरक्षितता राखण्याचे कार्य करत असतात परंतु रक्षाबंधन सण हा अनादी काळापासून बहिण भावाच्या पवित्र नात्याचा व बहिणीची सुरक्षा करण्यासाठी भावाने दिलेले वचन निभावण्याचा सण म्हणून साजरा केला जातो .  पोलीस बांधव हे समाजातील अशा सर्वच बहिणींची सुरक्षा करण्यासाठी तत्प र असतात.
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनीधी ( अशोक म्हात्रे )     प्रो.(डॉ. )मृत्युंजय पांडे को लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड सोसाइटी ऑफ एकेडमिक रिसर्च फॉर रूरल डेवलपमेंट के द्वार शिक्षा के क्षेत्र में सेंट विल्फ्रेड कॉलेज के प्रचार्य डॉ. मृत्युंजय पाण्डेय को लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया। डॉ मृत्युंजय पाण्डेय 16 वर्ष से अधिक समय से विद्याथियों के उनके करियर बनाने में मदद कर रहे हैं। डॉ. पाण्डेय कानून शिक्षा, ग्रामीण क्षेत्रों के विद्यार्थी को शिक्षित करने में अपना योगदान दे रहे। उनके विशिष्ट कार्यों के लिए अलग-अलग काई संथायों से सम्मान मिला है। डॉ. पांडे ग्रामीण विद्यार्थियों को जिनका कोई समर्थन नहीं, उन्हें कानून की पढ़ाई में मदद कर उसकी कानूनी फर्म खुलवा के उनके भविष्य को बचाने में मदद करते हैं। ग्रामीण क्षेत्रों के अभिभावक डा. पाण्डेय पर ऐसे भरोसा करते हैं जैसे वैदिक काल के कुलगुरु हों। डॉक्टर पाण्डेय के छात्र जबतक आपने को विधि के के क्षेत्र में अपने को स्थापित नहीं कर लेते तब तक डॉक्टर पांडे उनके सहयोग में लगे रहते हैं। डॉक्टर पांडे यूनिवर्सल क्लास का संचालन करते हैं जिसमें ग...
Image
आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग प्रतिनिधी ( अशोक म्हात्रे ) महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग चा रक्षाबंधन सण उत्साहात सं पन्न पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय ज्योतिका हरियाण यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.          कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव , पोलीस हवालदार दाजी सावंत , पोलीस नाईक रुपेश गुरव पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे आदी पोलीस बांधवांना जिल्हा सचिव सुप्रिया पाटील , सदस्य संगीता पाटील, स्वरदा खांडेकर , सई पाटील यांनी राखी बांधून रक्षाबंधन सणाचे महत्व जपले.           अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते.         आपल्या विभागात कार्यरत हे पोलीस बांधव समाजातील बहिणींच्या संरक्षणासाठी कर्तव्यावर तत्पर असतात याचीच जाणीव ज्योतिका हरिया...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी  महिला उत्कर्ष समिती उलवे चा पोलीस जवानांसोबत रक्षाबं धन सण साजरा पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे नोड विभागातील भगिनींनी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले यांच्यासह रवी पवार , मनोज जाधव, वृषाली मोकल आदी जवानांना राखी बांधून आपला रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी प्रदेश सचिव एडवोकेट दिव्या लोकरे यांच्यासह समितीच्या सहकारी भगिनी उलवे नोड अध्यक्ष विनश्री कदम , सचिव प्रमिला सातपुते, सीवूड अध्यक्ष संगीता शेटे व वंदना मोरे उपस्थित होत्या. यावेळी उपनिरीक्षक सुधाकर भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व म्हणाले की आपल्या संस्कृतीचा हा सण बहिणीच्या सुरक्षिततेची हमी देणारा असून पोलीस या नात्याने आमच्या कार्यक्षेत्रातील सर्वच बहिणींना सुरक्षित वावरता यावे यासाठी पोलीस दल वचनबद्ध आहे.  महिला उत्कर्ष समितीच्या बहिणींनी आम्हा पोलीस बांधवांना राखी बांधून आमच्या कर्तव्याप्रति कार्यतत्पर राहण्यासाठी उद्युक्त  कर णारा क्षण आहे .
Image
 पालपेणे कुंभारवाडी येथील सुकन्या डॉ. कु. धनश्री दिनेश साळवी हिचा मनसे गुहागरच्या वतीने सत्कार वरवेली वार्ताहर-  गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील सुकन्या डॉ. कु.धनश्री दिनेश साळवी एम.बी.बी.एस. (रशिया) हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरच्या वतीने तिच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. रशिया सारख्या प्रगत देशात एम.बी.बी.एस.शिक्षणं पुर्ण करणारी गुहागर तालुक्यातील ती एकमेव असून तिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  यावेळी डॉ.कु. धनश्री हिचे वडिल दिनेश साळवी, तिची आई दीप्ती साळवी, मनसे विभाग अध्यक्ष अमित खांडेकर, पत्रकार गणेश किर्वे, विवेक माडगुळकर,  संतोष टाणकर, प्रशांत साटले,तेजस टाणकर, तुषार शिरकर, ऋतिक गावणकर, सुरज कदम आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. धनश्री साळवी हिने मनसेच्या वतीने सत्कार केल्याने त्यांचे आभार व्यक्त केले. तिने स्त्रीरोगतज्ञ होणार असल्याची इच्छा व्यक्त केली. पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समिती तर्फे 
Image
आवाज कोकणचा / ठाणे   ( श्रुति उरणकर ) महिला उत्कर्ष समितीने रेल्वे पोलीस बांधवांसोबत साजरा केला रक्षाबंधन सोहळा. महिला उत्कर्ष समितीने रेल्वे पोलीस बांधवांसोबत साजरा केला रक्षाबंधन सोहळा..... ------------------------------------------------          पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कार्याध्यक्ष सौ श्रुती उरणकर यांनी कल्याण येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.               कल्याण जवळील ठाकुर्ली येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्ष डॉक्टर स्मिता पाटील , कार्याध्यक्ष सौ श्रुती उरणकर , सदस्य सविता ठाकूर , सुनिता मिश्रा , स्वाती हिरवे , नूतन यादव यासह अनेक भगिनी उपस्थित होत्या.            ठाकुर्ली 12 वी बटालियन विभागाचे डी. आय. जी. श्री. हेमंत कुमार., सैन्य सहाय्यक श्री.अजय संसारे, निरीक्षक मुख्यालय श्री.एल व्ह...
Image
आवाज कोकणचा / पनवेल प्रतिनीधी  आजिवली विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार- चेअरमन राजेंद्र पाटील  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्या वाटप  पनवेल(प्रतिनिधी) पुढील शैक्षणिक वर्षांपासून आजिवली येथील जनता विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून येथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी दोन हजार लिटरची सिंटेक्स टाकी देणार असल्याची घोषणा जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी आज (दि. २२ ऑगस्ट) येथे केले.  श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आजिवली येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालययातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, गोविंद पाटील, नाना भागीत, कान्हा कडव, राम पाटील, प्राचार्य श्री. चवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.  यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यांनी, दरवर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदा...
Image
  आवाज कोकणचा उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )  ग्रामपंचायत बांधपाडा(खोपटे) येथील पोट-निवडणुकीत शिवसेनेचे रितेश सदानंद ठाकूर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड. नवनिर्वाचित उपसरपंच रितेश सदानंद ठाकूर यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट. बांधपाडा(खोपटे) ग्रामपंचायत उपसरपंच सुजित म्हात्रे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते, या उपसरपंच निवडीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व तालुका संघटक बी.एन डाकी यांच्या आदेशानुसार रितेश ठाकूर यांना उमेदवारी दिली गेली, तसेच उपसरपंच पदासाठी त्यांचा शिवसेना,काँग्रेस आघाडी तर्फे अर्ज दाखल केला.पण ग्रामपंचायत सदस्य देवानंद ठाकूर यांनी सुद्धा उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेचे रितेश ठाकूर हे बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले.त्याबद्दल खोपटे पंच-क्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उपसरपंच पदी निवड होताच सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी नवनिर्वाचित उपसरपंच रितेश ठाकूर यांनी शिवसेना जिल्हाप्रम...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महिला उत्कर्ष समिती उलवे चा ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांच्या सहकार्याने  महिला उत्कर्ष समिती उलवे नोड अध्यक्ष विनश्री कदम यांनी प्रदेश सचिव एडवोकेट दिव्या लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमिला सातपुते, ललिता बने, जयश्री पावशे, वृषाली पेडणेकर , जयश्री पाखरे, प्रमिला साने , कांचन यांच्यासह विभागातील अनेक महिला भगिनींनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले.  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विभागातील महिलांना एकत्र आणून वर्षा लोकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी व ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला व समाजाप्रती आपले देणे वृक्षारोपणाच्या माध्यमातून व्यक्त करत प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन केले .