Posts

Showing posts from October, 2023
Image
आवाज कोकणचा / प्रतिनीधी उरण ( पूजा चव्हाण)  उरण मधील भंगाराच्या गोदामाला भीषण आग ....आगीत कोणती वित्तहानी नाही ...पण आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात ...  उरण बोरी येथील रमजानच्या भंगाराच्या गोदामाला काल दिनांक २७/१०/ २००३ रोजी सकाळी १०.३० त्याच्या सुमारास भीषण आग लागली ही आग एवढी मोठी होती  या आगीच्या ज्वाला खूप उंचावर दिसत होत्या त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गोदामा मध्ये कित्येक वर्षापासून लाकडी पॅलेट, जुनी लाकडे, प्लास्टिक पॅलेट, प्लास्टिक बाटल्या, डबे, व इतर भंगारचा धंदा या गोदामध्ये सुरू होता.  गोदामाला आग लागली कळतात अग्निशामक दलाच्या दहा गाड्या त्वरित घटनास्थळी येऊन त्यांनी तसेच जनतेने, व शासकीय यंत्राच्या मदतीने ही तीन ते चार तासात ही भीषण आग आटोक्यात आणली.यावेळी ओ,एन,जी,सी, अग्निशामक दल सिडको अग्निशामक दल, एन,ये,डी अग्निशामक दल, व एम,येस, सी, बी,अग्निशामक दल यांनी आटोक्यात प्रयत्न केल्यानंतर ही भीषण आग आटोक्यात आली.आगेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली तरी यात मोठ्या प्रमाणात गोदामातील मालमत्तेचा नुकसान झालेला आहे. जरी...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी  पेण गडब परिसरातील शेतकऱ्यांची तलाठी शोधण्यासाठी वणवण... पेण, अरूण चवरकर पेण तालुक्यातील काराव,खारघाट, खारमाचेला, खारजांभेला, खारढोंबी, खार चिर्बी,खारकारावी,खारदेवळी,केळंबी, डोळवी, वडखळ, कोळवे, वावे, कोलेटी या चौदा गावांसाठी एक तलाठी पंकज डोंगरे शासनाने नेमला आहे परंतु तलाठी दर्जाचा हा अधिकारी या चौदा गावात बसत नसुन ते वाशिनाका येथे बसत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना या अधिकाऱ्याला शोधण्यासाठी शोधात खिशातील स्वतः पदरमोड करून वाशिनाका येथे जावे लागते आणि नाही भेटले तर पैसे व वेळ वाया जातो . या बाबतची तक्रारवजा व्यथा पत्रकार अरुण चवरकर, कमलेश ठाकूर यांना अनेक शेतकरी व ग्रामस्थानी केल्यानंतर चवरकर यांनी तलाठी डोंगरे याची भेट घेतली आणि त्यांना चौदा गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी बसण्याची विनंती केली . त्याप्रमाणे चर्चा होऊन वडखळ नाका येथे बसावे असे सुचवले तर वडखळ तलाठी ऑफिस मध्ये साप निघतात तसेच डोळवी येथील तलाठी कार्यालय मोडकळीस आले असल्यामुळे तिथे बसने शक्य नाही असे सांगीतले.  शेवटी गडब येथे बसा सांगितले व त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तलाठी पंक...
Image
आवाज कोकणचा / पनवेल अशोक म्हात्रे  दिनांक 23 ऑक्टोबर 23  पत्रकार उत्कर्ष समितीने केला दुर्गाशक्ती चा सन्मान  ...                    पत्रकार उत्कर्ष  समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अभिनव संकल्पनेतून नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत समाजातील दुर्गास्वरूप असणाऱ्या विविध क्षेत्रांतील  महिलांचा दुर्गाशक्ती पुरस्कार प्रदान करून गौरव केला.  पनवेल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या सोहळ्यात पोलीस खाते, वाहतूक शाखा, पत्रकार, डॉक्टर, समाज सेविका, वकील, स्वच्छ्ता कामगार, परिचारिका व कलाकार अशा विविध क्षेत्रांतील दुर्गांचा सन्मान करण्यात आला.  पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष श्रुती उरणकर , उपाध्यक्ष आरती पाटील,  सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे , नवी मुंबई अध्यक्ष वर्षा लोकरे, मुंबई उपाध्यक्षा सोनाली मेमाणे, उलवे नोड सचिव प्रमिला सातपुते, सुगंधा म्हात्रे यांच्या हस्त्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची  सुरुवात करण्या...

बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीजने "जागतिक अन्न दिन" साजरा .....

Image
  बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीजने "जागतिक अन्न दिन" साजरा ..... कोळखे/प्रतिनिधी   बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीजने 16 ऑक्टोबर 2023 रोजी "जागतिक अन्न दिन" साजरा केला. जागतिक अन्न दिना निमित्त 300 हून अधिक गरीब लोकांना जेवण वाटप करण्यात आले. हिज ग्रेस मार्टिन मोर अप्रेम एपिस्कोपा यांच्या प्रेरणेने पनवेल येथील इंद्रा नगर झोपडपट्टीतील 300 गरीब आणि गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात आले. गरीब आणि गरजू लोकांना पुढे जाऊन मदत करण्यास बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीज नेहमी कार्यरत असते.                     त्यावेळी स्थानिक नेते अशोक थांबे आणि सामाजिक कार्यकर्त्या जरीना नाझिया यांच्या उपस्थितीत जेवण  वाटप करण्यात आले; तसेच फादर तीमोथी रॉड्रिग्ज, फादर प्रभाकर आणि  महेश राऊत ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई अशोक म्हात्रे कोळखे दिनांक १४ ऑक्टोबर २३   सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'जागतिक हात धुणे दिवस' आणि 'मोफत वैद्यकीय शिबिर' संपन्न  पत्रकार उत्कर्ष समिती, जगदंब ग्रुप सामजिक संस्था व आधार हॉस्पीटल पनवेल यांच्या सहकार्याने सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे पनवेल येथे ग्लोबल हॅन्ड वॉश डे , ( 'जागतिक हात धुणे दिवस )' व मोफत विद्यार्थ्यां आणि पालकांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते.  शाळेचे फादर संकेत मशिह यांनी प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली.  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी स्वच्छतेचे महत्व तसेच 'जागतिक हात धुणे दिवस' या विषयी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि केवळ हा दिवस एका दिवसासाठी न पाळता आयुष्यभर पाळण्याचे आवाहन केले.   या कार्यक्रमांनंतर आधार हॉस्पिटल पनवेल व जगदंब ग्रुप सामाजिक संस्था आणि पत्रकार उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 300 विद्यार्थ्यांनी उपचार घेतले.  आ...
Image
 आवाज कोकणचा /  नवी मुंबई  निलेश उपाध्याय नवी मुंबईत ‘गुजरात भवना’च्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 08 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथे गुजरात भवनच्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त गुजरात भवनच्या विद्यमान विश्वस्तांनी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.गुजरात भवन समितीचे अध्यक्ष श्री.हसमुखभाई कनानी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की आज आपण पाहत आहात ते भव्य संकुल उभारण्यासाठी इतकी वर्षे अहोरात्र अथक परिश्रम करणाऱ्या सर्व देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. रौप्यमहोत्सवी सोहळा सायंकाळी ५:०० वाजता सुरू झाला, सर्वप्रथम तन मन धनाच्या सर्व देणगीदारांचे मंचावरून आभार मानण्यात आले, त्यानंतर गुजरात सरकारचे मान्यवर मंत्री व कमिटी मेंबर नी आपली मनोगत व्यक्त केली त्यानंतर गणपती वंदना जाळी सोबत केक कापून  रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर सर्वांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था होती व रात्री वाशी चा विष्णुदास भावे  सभागृहात सांस्कृतिक प्रोग्राम आयोजित  केला होता संस्थापक विश्वस्त श्री कनूभाई काना नी यांनी आमच्या प्रतिनिधीला सां...

पेंधर गावामध्ये नि:शुल्क वैद्यकीय सेवेच्या पहिल्या नवीन शाखेचे उद्घाटन

Image
  पेंधर  गावामध्ये  नि:शुल्क वैद्यकीय सेवेच्या  पहिल्या नवीन शाखेचे उद्घाटन...               शुक्रवार दिनांक 29. 9. 2023 रोजी स्माईल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी च्या माध्यमातून नि:शुल्क चिकित्सा परामर्श  केंद्राचे उद्घाटन नगरसेवक मा.श्री. संतोष बाबुराव भोईर, यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी श्री. गजानन तुकाराम भोईर, श्री. कांता पदू  पाटील, श्री. बबन आबा भोईर, श्री. दत्तात्रेय शंकर भोईर, श्री. गुरुनाथ मारुती पाटील, श्री. भगवान रघुनाथ भोईर, श्री. प्रभाकर चंदर भोईर, श्री. नितीन मारुती भोईर, श्री. सुरज मुकुंद गायकर, श्री. विलास मनोहर गायकवाड, डॉ. संतोष आर. जगे. डॉ. यू.बी. शेलार, या सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.  या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, वैद्यकीय,आरोग्य सेवा तसेच मनुष्याचे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक दुःख कमी करण्याचे प्रयत्न करून ओपीडी च्या माध्यमातून जनतेला निशुल्क सेवा देण्याची स्माईल एज्युकेशन अँड वेल्फर सोसायटी  चे अध्यक्ष -प्रवीण कुमार सोनकवडे, सचिव- संजय कुमार वर्मा, खजिनदार -राहुल मान...