
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास मंजूर; आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल (प्रतिनिधी) : नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. यामुळे या परिसरातील विकासाला अधिक चालना मिळणार असून याकामी आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे. नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली मुबई कॉरिडॉर हा जेएनपीटीला तथा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पोहोचणार आहे. सदर मुबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग बदलापूर नंतर पनवेल तालुक्यातील शिरवली, चिंध्रण गावाजवळून मोरबे सर्कलपर्यंत आलेला असून त्यापुढे तो महाराष्ट्र शासनाच्या विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरीडॉरला जोडलेला आहे. मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई कॉरीडॉर पनवेल तालुक्या...