सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार.

सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार. पनवेल ता.२८ (बातमीदार अशोक घरत ) * पनवेल तालुक्यातील कोन गावातील सुपुत्र प्रबोध नंदकिशोर म्हात्रे याने आपले सैनिकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेमध्ये सैन्य भरती झाल्याने कोन ग्राम पंचायतीच्या वतीने त्याचा अग्निवीर म्हणून सन्मान करण्यात आला.* *प्रबोध म्हात्रे याची अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलात चार वर्षासाठी निवड झालेली असल्याने त्याचा सत्कार सन्मान समारंभ आयोजित केला होता.प्रबोध याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक दोन वर्षे तो कोल्हापूरमध्ये एका सैनिकी अकॅडमी मध्ये शिक्षण घेत होता.घरची परिस्थिती बेताची असल्याने तो त्याच्या मामाच्या सहकार्याने सर्वकाही शिक्षण घेत होता.कोल्हापूरला सैनिकी अकॅडमी मध्ये शिक्षण घेऊन देशासाठी काही तरी करायचे,हे ध्येय मनाशी बाळगून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.आज त्याची भारतीय सैन्य दलात अग्नीवर म्हणून निवड झाल्याने संपूर्ण गावाला त्याचा अभिमान वाटला म्हणून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.* *कोन ग्रामपंचा...