Posts

Showing posts from June, 2024
Image
आवाज कोकणचा / ठाणे  प्रतिनीधी  अनाथ गरीब गरजु मुले हे समाजाचे उत्तर दायित्व...  गजानन फडकले अध्यक्ष सेवा समाधान फाऊंडेशन ठाणे मुंबई- रविवार दि. 30 जून रोजी  येऊर ठाणे येथे सेवा समाधान फाऊंडेशन तर्फे विवेकानंद बाल आश्रमातील अनाथ गरीब गरजु मुलाना शालेय वस्तु वाटपाचा कार्यक्रम पार पाडला. त्यावेळी अध्यक्षानी वरील उदगार काढले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. आईवडीलांचे छत्र नसलेल्या मुलाना तेवढाच सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, जेवढा सनाथ मुलाना आहे आणि ही जबाबदारी सर्वस्वी समाजाची आहे. आज हे दायित्व विवेकानंद बाल आश्रम व सदगुरू सेवा ट्रस्ट यशस्वी पणे पार पाडते आहे. हे खरेच कौतुकास्पद आहे. असे विधान गजानन फडकले अध्यक्ष, सेवा समाधान फाऊंडेशन यांनी केले. यांचे संगोपन, निगराणी व सक्षम नागरिक घडवणे हे खरेच कठीण काम आहे. म्हणूनच याना हातभार लावण्यासाठी आमची संस्था पुढे आली आहे. यावेळी 40 बालगोपाळ मंडळीना शालेय बॅगा वाटप व अल्पोपहार म्हणून देण्यात आला.  सुरवातीला सदगुरू सेवा ट्रस्ट चे व्यवस्थापक आनंद सर यानी आपल्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली, तर विश्वस्त सौ. मानसी म...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई  प्रतिनिधि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लागू,  महिन्याला १५०० /- रू. मिळणार,  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै पासून अर्ज सुरु ! *👉 योजनेचे स्वरूप :* पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Trancter) सक्षम बँक खात्यात दरमहा रु. १,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु. १,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. *👉 योजनेचे लाभार्थी :* महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्त्या आणि निराधार महिला. *👉 योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :* (१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. (२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. (३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत. (४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे ...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई  पनवेल / अशोक म्हात्रे  - दिनांक २८ जून २४ छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागाने अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले; विद्यार्थ्यांची जागतिक यशाची गाथा ... छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, नवी मुंबई, एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था, यांनी B.Tech इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, B.Tech इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि M.Tech इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन शिक्षण) या विषयांसाठी अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. शैक्षणिक उत्कृष्टता, तांत्रिक अवसंरचना आणि कार्यक्षम ऑनलाइन परीक्षा आयोजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठात B.Tech इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन कार्यक्रमांचा समावेश आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. विकास कुमार यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या यशाची विशेष उल्लेखनीय बाब म्हणून सांगितले की, "आमचे...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई   ॲड. दिव्या लोकरे  एक जुलैपासून देशात बदलणार तीन प्रमुख कायदे एक जुलै २०२४ पासून एक मोठा बदल होणार आहे. देशातील तीन प्रमुख कायदे बदलणार आहेत. भारतीय संसदेने अलीकडेच पारित केलेले तीन प्रमुख न्यायिक सुधारणा कायदे १ जुलैपासून लागू होतील.  भारतीय न्यायिक संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023, भारतीय पुरावा कायदा 2023 अशी या कायद्यांची नावे आहेत.  भारतीय न्यायिक संहिता 2023 हा कायदा भारतीय दंडविधान अर्थात आयपीसीची जागा घेईल.भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 हा कायदा दंडप्रक्रिया संहिता अर्थात सीआरपीसीची जागा घेईल.भारतीय पुरावा कायदा 2023 हा कायदा पुरावा कायद्याची जागा घेईल. भारतीय न्याय व्यवस्था आधुनिक आणि अधिक समर्पक बनवणे आणि वसाहतवादाच्या मानसिकतेतून मुक्त करणे हा या सुधारणांचा मुख्य उद्देश आहे. नवीन कायद्यांचा संक्षिप्त परिचय: भारतीय न्यायिक संहिता 2023 नुसार खून (कलम 302) आता कलम 101 म्हणून ओळखले जाईल. फसवणूक (कलम 420) आता कलम 316 म्हणून ओळखले जाईल. भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023मध्ये एकूण 533 विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. न...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण / वशेनी - श्री. कामेश्वर म्हात्रे महाराष्ट्र गुन्हे तपास पत्रकार टिम उरण  विभाग तथा सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान ९३/९४ बॅच तर्फे पिरकोन काशे डोंगरावर वृक्षारोपण संपन्न.. सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठान तर्फे आज दिनांक २३/०६/२०२४ रोजी सकाळी ठिक ६.४५.वाजता पिरकोन काशे डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.       "पर्यावरणाचा -हास " ही जागतिक समस्या होत असताना, 'पृथ्वीचे वाढत्या तापमान', आणी 'निसर्ग संवर्धन'  काळाची गरज ओळखून आज तिस-यांदा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या लागवडी मध्ये पर्यावरण फणस , आंबा, जांबुळ, चिकू सारखी फळझाडे तर करंज, अर्जून, वड , पिंपळ सारखी जंगली झाडांचे वृक्षारोपण केले . डोंगर,  माळरानावर ही झाडे जेव्हा वाढतील, तेव्हा पशूपक्षांना चारा, निवारा, मिळेल, मानवांना फळे, फुले, सावली मिळेल, आणि हिरवागार निसर्ग वाढीमुळे पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन होईल.             या कार्यक्रमाला *श्रीनंदाई प्रतिष्ठान वशेणी , चे अध्यक्ष डॉक्टर हिराचंद पाटील...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण - पुजा चव्हाण  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील  यांच्या अचानक जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली:शरद पवार          राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत ( भाऊ ) पाटील यांचे २० जून २४ रोजी हृदय विकाराने अकस्मित निधन झाले .त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर दु;खाचा डोंगर कोसळला आहे.                त्यांच्या निधनाचे हे वृत्त समजताच राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उरण येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटील यांच्या पत्नी व मुलांसह प्रशांत पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित होत्या. प्रशांत पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून,प्रशांत पाटिल यांची मुले आदित्य , आद्वेत व् पाटील कुटुंबियांची विचारपूस केली. प्रशांत पाटील यांच्या अचानकपणे झालेल्या निधना मुळे पक्षाची मोठी हानी झाली असून राष्...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण / पूजा चव्हाण २३ जून २४ नगराजशेठ सीबीएसई स्कूल उरण येथे  योग दिवस मोठया उत्साहात साजरा                 संपूर्ण जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला, या योगदिनाचे औचित्य साधून उरण मधील “नगराजशेठ सीबीएसई स्कूल” उरण येथे योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या योगदिनाचा शुभारंभ स्कूलचे व्यवस्थापक तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांच्या हस्ते श्री गणेश पूजन व श्रीगणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तर साईंच्याप्रतिमेस स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.ज्योती म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून करणायत आला.          यावेळी रेनु सिंग मॅडमने योग विषयक माहिती देताना त्या म्हणाल्या आपल्या कॉलेजदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, आणि त्याचवर्षी 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला. इतकेच नाहीतर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई  मिलिंद खारपाटील  / चिरनेर दि. 23 जून 24 ही दोस्ती तुटायची नाय! वृक्षारोपण करून सर्वांना दिला  पर्यावरण प्रेमी संदेश सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ गृप चे यावर्षी चे पावसाळी गेट टू गेदर  रविवार दिनांक २३ जून रोजी  बापूजी मंदिर चिरनेर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेले मित्र यावेळी आवर्जून उपस्थित होते.शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.बालपणीचा काळ सुखाचा होता असेही मत काहींनी व्यक्त केले. या गृप मधील अनेकांनी अतिशय कठीण परिस्थितीत कष्ट करून शिक्षण घेतले . या ग्रुपकडून बापूजी मंदिर परिसरात आज आंबा आणि करंज वृक्षांची लागवड करण्यात आली.वृक्षारोपण करून इतर पर्यावरणप्रेमींना देखील हा चांगला संदेश देण्यात आला. त्याचबरोबर ही झाडे जगविण्यात येतील ही हमी त्यांनी दिली.पर्यटकांकडून या परिसरात प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या टाकल्या जातात . त्यादेखील उचलून या परिसराची साफसफाई करण्यात आली. यापुढील प्रत्येक गेट टू  गेदर आणि सहलीत किमान एकतरी सामाजिक ,शैक्षणिक आणि ऐतिहासिक उपक्रम राबवायचा असे ठर...

महिला उत्कर्ष समितीतर्फे वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण...

Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई  प्रतिनिधि 21 जून 24 महिला उत्कर्ष समितीतर्फे वटपौर्णिमा निमित्त वृक्षारोपण व योग दिवस साजरा... पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांसाठीच्या संघटनेचे उपअग असलेली महिला उत्कर्ष समितीच्या राज्यभरातील महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधत वृक्षारोपण केले . वाढते शहरीकरण व बदलत्या राहणीमानातील परिस्थितीमुळे परंपरागत साजरे होत असलेले सण ही अनेक वेळा औपचारिकता केल्यासारखे दिसते.    वटपौर्णिमा या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचा प्रघात आहे परंतु वाढत्या शहरीकरणामुळे या वृक्षांची कमतरता दिसून येते वटवृक्ष हा सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडणारा वृक्ष आहे व पुराणकाळात त्याचे महत्त्व आहे. या वृक्षाची पूजा करण्यासाठी अनेक वेळा त्याच्या फांद्या तोडल्या जातात हाच मुद्दा लक्षात घेऊन पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी समितीच्या महिला सदस्या व पदाधिकाऱ्यांना वटपौर्णिमेच्या दिवशी एक तरी झाड लावण्याचे आवाहन केले होते व त्यास समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला . महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण दिनांक 18 जून 24 पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न..... पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र या राज्यस्तरीय पत्रकार समितीच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या जाणिवेतून उरण तालुक्यातील नवघर येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले उरणचे पत्रकार उत्कर्ष समिती सदस्य श्री विशाल डाके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व सरपंच सौ. सविता मढवी यांच्या शुभहस्ते सरस्वती, श्री गणेश व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . या कार्यक्रमासाठी उपसरपंच विश्वास तांडेल, माजी उपसरपंच रवींद्र भोईर, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर तांडेल , समाजसेवक मोतीराम डाके , जितेंद्र माळी, चेतन पाटील , परशुराम कोळी शुभम पाटील, नितीन मढवी यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते . शाळेच्या मुख्याध्यापिका सुविद्या म्हात्रे , सौ उषा गावंड , श्री गणेश गावंड, श्री प्रकाश जो...
Image
आवाज कोकणचा / खोपोली  प्रतिनिधि/ 16 जून 24 तुषार तानाजी कांबळे यांची आरपीआय सचिव पदी नियुक्ती    दिनांक १५ जून २०२४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह पुणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ती समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमांमध्ये तुषार तानाजी कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती ऍड एल. टी. सावंत माजी आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड व डॉ. सतीश केदारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रमिक ब्रिगेड यांच्या हस्ते करण्यात आली , तुषार कांबळे हयानी अनेक वर्षापासून आरपीआय मध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्य केले आहे तसेच व्यवसाय, महिला, बालविकास, युवा युवती यांना न्याय मिळवून देण्याकरता कार्य करत आहोत कांबळे हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ती समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड एल. टी. सावंत माजी आमदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड व स्वागत अध्यक्...