
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि/ शैलेश ठाकुर वाको इंडिया किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने गोवा मापुसा येथे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन 24 ते 28 जुलै पर्यंत करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार , सेक्रेटरी धीरज वाघमारे तसेच रायगडचे अध्यक्ष सुधाकर घारे, सेक्रेटरी दिपेशन सोलंकी, पंच व कोच व विशेष मार्गदर्शक सतीश राजहंस, मकरंद जोशी, शिवानी राजहंस संतोष मोकल, बंडू पाटील, या महाराष्ट्र टीम चाल सहभाग होता. सर्व महाराष्ट्र टीम यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 48 व्या वर्षी मास्टर्स मध्ये रायगड मधून सहभाग घेऊन (श्री. शैलेश सिताराम ठाकूर 2 ब्रॉन्झ मेडल) सिनियर मधून (सानिका ठाकूर, पियुष धायगुडे, ब्रॉन्झ ) (शुभम म्हात्रे 1 सिल्वर, 2 ब्रॉन्झ,) (सिद्धी ठक्कर सिल्वर ) दिव्या पाटील, आदित्य ठाकूर, आकाश भिडे, यश जोशी, केवल मोकळ सहभाग पात्र ठरले. महाराष्ट्र 33 गोल्ड, 22 सिल्वर, 39 ब्रॉन्झ मेडल मिळवून प्रथम चॅम्पियनशिप ट्रॉफी चे मानकरी ठरल्यामुळे महाराष्ट्रातून सर्व खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच...