
आवाज कोकणचा / नवी मुंबई उरण न्हावाशेवा वाहतुक शाखेमार्फत बेशिस्त वाहतुकीला पोलिसांचा लगाम.. . उरण न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1853 वाहन चालकांवर कारवाई, 21 लाख दंड वसुली प्रतिनिधी पूजा चव्हाण नवी मुबंई ता.( उरण ) उरण न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हददीतील पार्किंग व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले होते ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह जागतिक स्तरावर वाहतूक होत असलेल्या न्हावा शेवा बंदरातील अवजड वाहतुकीवर विपरीत परिणाम होत होता. अशा बेशिस्त वाहक चालकांविरोधात 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 24 दरम्यान राबवण्यात आलेल्या मोहिमेतून कारवाई करण्यात आली असून वाहतूकीचे नियम तोडणारे 1852 वाहन चालकांवर कारवाई करून 21 लाख दंड वसूल करण्यात आला आहे. बेशिस्तपणे वाहन चालवणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यामुळे उरण न्हावा शेवा परिसरात काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण हे वाढत असल्यामुळे न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी एका मोहीमे द्वारे बेशिस्त वाहक चालकांना शिस्त ल...