
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी ( उलवे) दि. 29 डिसेंबर सकल मराठा समाजातर्फे उलवे येथे मस्साजोग प्रकरणातील संतोष देशमुख यांना श्रद्धांजली व जाहीर निषेध.. आज रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी सकल मराठा समाज उलवे विभागाच्या वतीने मस्साजोग , जिल्हा- बीड, गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख( सरपंच ) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्यावर झालेला हल्ला व निर्घृण पद्धतीने केलेला खून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाचे समन्वयक यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला व श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय संतोष देशमुख (सरपंच) यांच्या खुनातील काही मोकाट आरोपी यांना लवकरात लवकर अटक करावी . निपक्षपाती चौकशी करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. यासाठी सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अतिशय निंदनीय असे प्रकार शिवछत्रपती ,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पवित्र भूमीमध्ये घडत आहेत . या प्रकरणातील आरोपी हे प्रथमदर्शी सराईत गुन्हेगार असल्याचे निदर्शनास येत आहे....