
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी - अशोक म्हात्रे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मराठी भाषिक एकीकरण संघटनेने केला पोलिसांचा सन्मान ... आज दिनांक ३१/०५/२०२५ वार शनिवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मराठी भाषिक एकीकरण संघटना उलवे यांच्या वतीने आज उलवे पोलीस स्टेशन येथे महिला पोलीसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मराठी भाषिक एकीकरण संघटना ही आपल्याच पोलीस बांधवाना नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही देण्यात आली... तसेच उलवे पोलीस स्टेशन चेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन रजाने साहेब यांनी सुद्धा संघटनेला मार्गदर्शन केलं.व संघटनेला शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र आपल्यासाठीच कर्तव्य बजावत असतात.. ते आपल्यासाठीच म्हणून आपण सुखाने झोपत असतो.. ते पोलीस जरी असले तरी ते पहिल्यांदा ह्या मातीचे, महाराष्ट्राचे नागरिक आहेत. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची यशोगाथा हीच आपल्याला प्रेरणा देणारी आहे. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. ...