
आवाज कोकणचा / रायगड अलिबाग - बातमीदार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक VIII – 1982 बॅचचा अविस्मरणीय गेट-टुगेदर अलिबागमध्ये संपन्न अलिबाग राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक VIII मधील 1982 साली भरती झालेल्या जवानांनी आपली प्रदिर्घ सेवा पूर्ण करुन अधिकारी पदावर सेवानिवृत्त झालेले , तब्बल 43 वर्षे सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अलिबाग येथे एक अविस्मरणीय स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) नुकतेच साजरे केले. या कार्यक्रमाचे नियोजन अलिबाग दर्शन टीम यांच्या सहकार्याने रुक्मिणी कुंज रिसॉर्ट, सातीर्जे, बोंबटकरपाडा, अलिबाग येथे करण्यात आले होते. शांत आणि निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांनी एकमेकांना प्रेमाने मिठ्या मारून आपुलकीने भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. सदर कालावधीत दिवंगत झालेल्या एकूण 16 सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उपस्थितांनी शांततेत व आदराने उजाळा दिलाया स्नेहसंमेलनास 1982 बॅचचे विविध ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले एकूण 14 सेवानिवृत्त पोलीस अध...