Posts

Showing posts from May, 2023
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधी गॅलेक्सी हॉस्पिटल ठरते पेणच्या रुग्णांसाठी वरदान पेण, अरूण चवरकर पेण येथील Galaxy हाॅस्पिटल मध्ये रूग्णांची सेवा चालू असुन आजार कोणताही असो पाहिजे त्या आजारांवर स्पेशालिस्ट तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी दिवस-रात्र तय्यार असुन कोणतीही सर्जरी येथे केली जाते आता पुणे ,मुंबई येथे जाणारे रूग्ण येथे थांबत आहेत, कारण मेडिकल च्या नावाने आज रूग्णांची लाखो रुपयांची लुट होत आहे आणि हे कुठेतरी थांबायला हवं हे Galaxy हाॅस्पिटल च उद्दिष्ट आहे, आणि अशा अनेक प्रकारचे मोफत वैद्यकीय क्यांम्प येथे पेण च्या जनते च्या सेवेसाठी लावले जातात  कालच पत्रकार अरुण चवरकर यांनी Galaxy मध्ये भेट देऊन प्रत्येक्ष रूग्णांची चौकशी केली असता सुनील ठाकुर रा.पेण तांबरशेत वय वर्षे २६ याच पुणे येथे बाईक चालवताना अपघात झाला व पुणे येथे एका नामांकित हाॅस्पिटल मध्ये २० दिवस उपचार घेतले तेथे नवू लाख रुपये खर्च झाले पण पेशंट अवयवांची हाल चाल करत नव्हता शेवटी नातेवाईकांनी पेण येथील ग्यालक्षि हाॅस्पिटल मध्ये भरती केल आणि तेरा दिवस रात्र डाॅक्टर व सर्व स्टाफ यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि सुनील ठाकुर ...
Image
आवाज कोकणचा / पनवेल प्रतिनिधी    दीपक नायट्राईट आणि दीपक फाऊंडेशन तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने वाजे गावांमध्ये हायपरटेन्शनबाबत जनजागृती सत्र  या वेळी एकूण 35 जण सहभागी झाले होते. सत्राची सुरुवात MHU आणि त्याच्या विविध सेवांच्या परिचयाने झाली. उच्च रक्तदाब म्हणजे 140/90mm Hg पेक्षा जास्त रक्तदाब. डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत दुखणे, थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही त्याची लक्षणे आहेत. उच्चरक्तदाबाचे कारण आनुवंशिक आहे, मद्य, जास्त वजन आणि आहारातील बदल इ. आपण उच्चरक्तदाब रोखू शकतो जसे की; वजन कमी करणे, मीठ आणि लोणच्याचा कमी वापर, रोजचा व्यायाम आणि भाज्यांचा वापर आणि सकस आहार किंवा अन्न. 120/80mm Hg म्हणजे सामान्य रक्तदाब, 30-35 वरील लोकांनी नियमितपणे रक्तदाब तपासणे आवश्यक आहे आणि ते उच्च रक्तदाब आणि भविष्यातील धोके टाळण्यास मदत करेल. तुम्ही आमच्या MHU मध्ये येऊन तुमचा रक्तदाब तपासू शकता किंवा उपकेंद्राला भेट देऊ शकता. या कार्यक्रमाला दीपक फाऊंडेशनचे डॉक्टर प्रणव तायडे, नर्स सुनिता गोणते, समुपदेशक कल्याणी फडतरे, डाटा ऑपरेटर शिल्पा म्हात्रे, ड्रायव्हर शिवाजी भोसले, आंगण...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी चोरीचोरी चुपके चुपके सिडकोची अशी ही बनवा बनवी  सिडकोच्या वतीने उरण पनवेल महामार्गावरसह द्रोणागिरी शहरात मृत्यूचा सापळा उरण/पूजा चव्हाण         उरण पनवेल महामार्गावरसह द्रोणागिरी शहरात मृत्यूचा सापळा सिडकोच्या वतीने लावण्यात आला असून उरण द्रोणागिरी सेक्टर 15 मधील फुंडे गवाच्या कर्ल्व्हटवरील आर.सी.सी.स्लॅब कोसळून 14 मार्च 2021 रोजी दीपक कासुकर नावाच्या 30 वर्ष वयाच्या तरुणाचा नाहक बळी घेतल्या नंतर सिडकोने तातडीने दख्खल घेऊन सदरच्या याच मार्गावील बोकडवीरा सिडको कार्यालया जवळील बॉक्स कर्ल्व्हटच्या स्ट्रक्चरल ऑडिट सह द्रोणागिरी नोड मधील सर्वच बॉक्स कर्ल्व्हटचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. यानंतर सिडकोने द्रोणागिरी शहरांतील सेक्टर 52 मध्ये असणाऱ्या बॉक्स कर्ल्व्हटच्या दुरुस्तीचे काम वेगात सुरु केले असून दुरुस्ती सुरु असलेल्या बॉक्स कर्ल्व्हटवरून मात्र राजरोस पणे अवजड वहानांसह एस.टी.बस व एन एम.एम,टी.बस वाहतूक  सुरु आहे.या  बॉक्स कर्ल्व्हटच्या खाली दुरुस्तीसाठी लोखंडी पाईप टेकू लावण्यात आले असून जर यांतील एकदा पाईप जरी कोलमडला...

सीबीएसई बारावी आणि दहावीच्या परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल

Image
  सीबीएसई बारावी आणि दहावीच्या परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल पनवेल/आवाज कोकणचा/प्रतिनिधी             केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता बारावी आणि दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. 12) जाहीर केला. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने यंदाही धवल यश प्राप्त केले आहे. दहावी आणि बारावी अशा दोन्ही इयत्तांमध्ये विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच प्राचार्य व शिक्षकवृंदाचे अभिनंदन व कौतुक केले. इयत्ता बारावीत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सर्वच्या सर्व म्हणजे 179 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 139 आणि वाणिज्य शाखेच्या 40 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यालयातून भाग्यश्री शरद सुरासे (97.20%) प्रथम, आदिनाथ आपटे (95.80%) द्वितीय आणि पृथ्वी प्रवीण पाटील (95.60%) तृतीय आला. विशेष म्हणजे भाग्यश्रीने कोणताही क्लास न लावता हे यश मिळविले असून ती द...

आदित्य वृध्दाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" महड (खालापूर) यांची वाटचाल यशस्वी पूर्ण

Image
"आदित्य वृध्दाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" महड (खालापूर) यांची वाटचाल यशस्वी पूर्ण ! पनवेल /आवाज कोकणचा/ अशोक घरत ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून खालापूर महाड (देवस्थान) गावच्या "आदित्य वृद्धाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" येथे काही कामानिमित्त भर दुपारी जाण्याचा योग आला होता.ग्रुप ग्रामपंचायत कोन कमिटीचे सरपंच श्री.दीपक धा.म्हात्रे,जितेश बा.शिसवे (सदस्य),घन:श्याम पाटील(सदस्य),सौ.आशा अ.घरत(सदस्या) आणि अशोक ना.घरत (पत्रकार) या सर्वांच्या सोबतीने त्या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्धाश्रमाचे प्रमुख डॉ.धर्मेंद्र मारुती जावळे राहणार खोपोली यांनी वृद्धाश्रम कार्यालयाच्या ऑफिसमध्ये आम्हा साऱ्यांना नेऊन आमचे यथोचित स्वागत केले व नंतर काही वेळाने आम्हांला सोबत घेवून तेथील वृद्धाश्रमाबद्दल संपूर्ण माहिती देताना, त्या वृद्धाश्रमात राहत असणाऱ्या सर्व वृद्ध स्त्री-पुरुष यांच्याबरोबर ओळख करून दिली.आम्ही साऱ्यांनी तेथील वृद्धांशी गोड संवाद साधून त्यांचे आशीर्वादही घेतले. वृद्धाश्रमातील व्यवस्थापन अतिशय छान आणि सुंदरसे,तितकेच कौतुकास्पद पाहून मनाला एक वे...
Image
 आवाज कोकणचा / प्रतिनीधी  पुजा चव्हाण - उरण हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे. उरण दिनांक ५ मे २०२३ एन एस पी टी प्रकल्प विस्थापित शेवा (हनुमान) कोळीवाडा गावाचा दस्ताऐवज शासनाने ग्रामपंचायतला दिला नसल्याने ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयाला हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहे . रायगड जिल्ह्यात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाला टाळे ठोकणे ही घटना पहिलीच असल्याची चर्चा उरण तालुक्यात सुरू आहे. हनुमान कोळीवाडा गावातील भूखंडधारक शेतकरी ८६ व बिगर शेतकरी १७० मिळून २५६ कुटुंब यांच्या यादीसह एकूण १७ हेक्‍टर जमिनीचा मौजे हनुमान कोळीवाडा गाव वहिवाट नकाशा व आकार बंद आणि गाव नमुना नंबर ७/१२ वर भोगावठादार नोंद करून नवीन ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांना शासनाने दस्ताऐवज दिलेला होता असे असताना ग्रामस्थ रमेश भास्कर कोळी यांनी दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेल्या माहिती अनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत मध्ये मागितलेल्या वरील नमूद दस्ताऐवज उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांनी माहिती अध...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधी शैलेश ठाकूर / नवी मुंबई    पंडित धायगुडे करणार नवीन विश्वविक्रम 257 किलो वजनाच्या पाच बाईक दीडशे वेळा नेणार पोटावरून.. पंडित धायगुडे या ध्येयवेढ्या इसमाने या अगोदर 257 किलोच्या दोन बाईक 121 वेळा पोटावरून नेऊन गिनिज बुकमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली आहे . स्वतःचाच विक्रम मोडीत काढून आणखी एक नवीन विश्वविक्रम करण्यासाठी पंडित धायगुडे सज्ज आहेत. रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे मैदानात 257 किलो वजनाच्या पाच बाईक दीडशे वेळा पोटावरून नेऊन नवीन विश्व विक्रम प्रस्थापित करणार आहेत.  धायगुडे चार वेळा ब्लॅक बेल्ट असून त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.  मूळचे सांगलीचे असलेले पंडित धायगुडे सध्या नोकरीनिमित्त नवी मुंबईत वास्तव्यास आहेत
Image
 आवाज कोकणचा / उरण प्रतिनिधी बेशिस्त वाहनचालकांना हिसका, उरण वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई. उरण ( प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून) उरण दिनांक.४ मे २०२३ रोजी उरण मध्ये उरण वाहतूक शाखा अंतर्गत उरण चारफाटा ते राजपाल नाका व वैष्णवी हॉटेल या भागात नो पार्कींग तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे ,विना हेल्मेट अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून उरण मध्ये नो पार्कींग चे फलक लावून देखील नागरिक पार्कींग करत असल्याने तसेच रस्त्यावर पांढरे पटीच्या आत वाहने लावण्याचे आदेश असून देखील रस्त्यावर बेशिस्त पार्कींग करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे .  त्यामुळे आज उरण वाहतूक शाखे कडून वाहतूक कोंडी होऊ नये .व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.  या साठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मध्ये नो पार्कींग ची कारवाई - १२५, विना हेल्मेट - १०२, सर्व एकूण कारवाई - २३८ या केसेसचा एकूण दंड - १,७७,४०० /- एवढा वसूल केला आहे  या कारवाई वेळी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड , व इतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
Image
 आवाज कोकणचा / प्रतिनीधी छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोपाचा रंगारंग कार्यक्रम  छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे नियोजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रमाचा आनंद लुटला.सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने कार्यक्रमाला मंत्रमुग्ध केले.  या कार्यक्रमाचे आयोजन कल्चरल क्लब व तृतीय वर्षाचे विद्यार्थी, जिस्मे, डीजे, डान्स, सिंगिंग, रॅम्प वॉक आदींनी केले होते. तुषार शवंत, साक्षी, वेदिका, यश, राज भगत, प्रियन, शाहील, अकील, रश्मी, ऋत्विक, वांगेल रेड्डी, प्रभात. , शाजिद, हर्षिता, इक्रा, अक्सा,  स्वप्नील माने, दीपक, अथर्व, प्रियांका, साक्षी, राज भगत, आकाश चिकणे, राज म्हात्रे, श्रुती माने, अमेय, ओंकार, राहुल, अथर्व, शिवानी पाटील, आदींनी उत्तम कामगिरी करून कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.डॉ.मृत्युंजय पांडे, प्राचार्य डॉ. लॉ कॉलेजचे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. दिनानाथ झाडे, एसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध ऋषी हे अतिथी होते. सीएसएमआयटी...
Image
  आवाज कोकणचा / उरण प्रतिनीधी मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर ते कळंबोली मध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत निवेदन आज खारघर टोल नाका ते कळंबोली मॅकडोनाल्ड येथे होणार्या वाहतुक कोंडी संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस निरीक्षक कळंबोली वाहतुक विभाग यांना निवेदन देण्यात आले.  येत्या ८ दिवांत कारवाई झाली नाही तर मनसे तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष श्री. संदेश ठाकूर यांनी दिला.  त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेचे सरचिटणीस श्री. आरिफभाई शेख, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस श्री. प्रणव कारखानीस, रायगड जिल्हा सचिव श्री.  अतुल चव्हाण , पनवेल महानगर उपाध्यक्ष कळंबोली श्री. अमोल बोचरे, पनवेल महानगर उपाध्यक्ष खारघर श्री. गणेश बनकर, पनवेल महानगर उपाध्यक्ष श्री. संजय मुरकुटे, पनवेल महानगर सचिव श्री. राहुल चव्हाण, वाहतुक सेना उपाध्यक्ष श्री. भगवान खताळ, सुजित सोनवणे, सहकार सेना कळंबोली शहर अध्यक्ष श्री. विवेक बोराडे, पनवेल विधानसभा अध्यक्ष वाहतुक सेना श्री. सचिन जाधव, प्रकाश लाड, दशरथ मुंडे व कळंबोली शह...
Image
  आवाज कोकणचा / पुजा चव्हाण  उरण दिनांक ३ मे २३ उरण नगर परिषद कार्यालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.    उरण नगर परिषद कार्यालय येथे सफाई कामगार तसेच सर्व कर्मचारी यांच्या करिता दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त श्री पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीच्या प्रोप्रायटर डॉ. नयना ठाकूर यांच्या सौजन्याने आणि वुई क्लब उरण, म्युनिसिपल एम्प्लाईज युनियन आणि शुश्रूशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री राहूल इंगळे यांच्या हस्ते होणार झाले. या प्रसंगी ज्येष्ठ नेत्र चिकित्सक तज्ञ , जे जे हाॅस्पिटलचे डिन म्हणून सर्वाधीक काळ काम पाहणारे डॉ. तात्यासाहेब लहाने हे उपस्थित होते, तसेच म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे कार्याध्यक्ष श्री. संतोष पवार, डॉ बी एम कालेल वैद्यकीय अधीक्षक , तालूका आरोग्य अधिकारी डॉ. ईटकरे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष श्री रवी भोईर, वुई आरती भाटिया, श्रीमती जैन‌ मॅडम, श्रीमती काटदरे मॅडम, श्री अनिल जगधनी, उरण नगरपरिषद...

वैद्यकीय व्यवसायकांना आकारण्यात येणारा परवाना शुल्क रद्द करावा - डॉ. वैभव मोकल

Image
वैद्यकीय व्यवसायकांना आकारण्यात येणारा परवाना शुल्क रद्द करावा - डॉ. वैभव मोकल   प्रतिनिधी/आवाज कोकणचा/आरती पाटील                  पनवेल महानगरपालिकेकडून वैद्यकीय व्यावसायिकांना परवाना शुल्क या संदर्भात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या त्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल डॉक्टर जनरल प्रक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.  वैभव मोकल व पदाधिकारी हे महापालिकेत व्यवसाय परवाना शुल्का बाबतीत विचारणा करण्यासाठी गेले. पनवेल महानगरपालिकेत कडून श्री हरिश्चंद्र कडू, करविभाग अधिकारी आणि श्री जयराम पादीर अधिक्षक यांनी आपल्या  काही वैद्यकीय व्यावसायि काना नोटीस दिली होती त्याच संदर्भात यांची भेट घेतली व चर्चा केली.त्यांनी व्यवसाय परवाना शुल्काबाबत माहीती दिली. ते फक्त कायदेशीर पद्धत अनुसरूनच सदर नोटीस काढली आहे असे सांगण्यात आले. त्यावर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांनी व्यवसाय परवाना शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. असोसिएशन तर्फे महापालिकेत संदर्भीत उपायुक्त साहेब यांना  सदर व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येऊ नये  असे निव...
Image
 आवाज कोकणचा / प्रतिनीधी  उरण तालुक्यात वाहतूक पोलिसांना मारहाण, संताप आणणारं कृत्य.... उरण ( पूजा चव्हाण )  उरण दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास उरण चार फाटा येथे उरण वाहतुकीचे पोलीस नाईक दयानंद राठोड वय वर्ष ३५ हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यासमोर एक अज्ञात इसम येऊन उभा राहिला, व त्यांना हातवारे करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावर दयानंद राठोड यांनी त्याला कोणाला शिवीगाळ करतो असे विचारले असता,अजून अश्लील भाषेत शिवीगाळ करून थांब माझ्या आईला बोलवतो मग मी तुला दाखवतो मी कोण आहे.असे म्हणत घरी गेला व काही काळाने आपली आई , बायको व दोन महिलांना सोबत घेऊन आला व कर्तव्य बजावत असलेले उरण वाहतुकीचे पोलीस नाईक दयानंद राठोड यांना सदरच्या इसमाने अंगातील शर्ट काढून येऊन परत शिवीगाळ करून गळपट्टी धरून धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली.  या मारहाणहीत पोलीस नाईक दयानंद राठोड यांना दुखापत झालेली असून आरोपीवर सरकारी कामात अडथळा तसेच सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम,३५३, ३३२, ५०४,५०६ अन्वय गुन्हा उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झ...