
आवाज कोकणचा / नवी मुंबई इंदिरा गांधी रुग्णालय ते बोरी पाखाडी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका अध्यक्ष पुजा चव्हाण यांची मागणी.. उरण / पुजा चव्हाण उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय ते बोरी पाखाडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. तालुक्यातील उत्कृष्ट सेवा देणारे असे रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी सामान्य रुग्णांसह, जेष्ठ नागरिक, महिला , रुग्णांच्या गाड्या, ॲम्बुलन्स यांची नेहमीच फार वर्दळ आसते. तसेच या रस्त्यालाच लागून थोड्याच अंतरावर दोन मोठी नामांकित विद्यालय आहेत. या विद्यालयात नेहमी हजारो विद्यार्थी ये जा करत असतात. या सर्वाना या रस्त्यावर चलताना खुप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्था मुळे येथे कित्येक वेळा अपघात देखील झालेले आहेत. तसेच या रस्त्याच्या किनाऱ्याला लागून मोठा नाला आहे. या नाल्याला कोणत्याही प्रकारचा संरक्षक कठडा नसल्याने एखादे वाहन तोल गेल्यास या नाल्यात जाण्याची शक्यता आहे त्या मुळे या नाल्याला कठडा बांधण्यात यावा. लहान मुले ही देशाची भावी पिढी आहे देशाचे भवितव्य आहे या रस्त्याच्...