पालपेणे येथे पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

आवाज कोकणचा / गुहागर प्रतिनिधि, २३ जुलै २२ पत्रकारांसाठी राज्यभर कार्यरत असणाऱ्या तसेच नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकार उत्कर्ष समितीचे गुहागर तालुका अध्यक्ष श्री दिनेश तानाजी साळवी यांच्या पुढाकाराने पालपेणे येथील जनसेवा एज्युकेशन सोसायटीच्या वरदान न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील इयत्ता दहावी मध्ये ८० टक्के व त्याहून अधिक गुणांनी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थ्याना शैक्षणीक साहित्य वाटप कार्यक्रम समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक ल. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प व लेखणी देऊन गौरविण्यात आले. शाळेत पहिली आलेल्या रिया रघुनाथ बैकर. हिने फार्मसिस्ट होण्याचे धेय बाळगले असून समिती अध्यक्ष डॉ. म्हात्रे व शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. व्हीं. हासबे यांनी पुढील काळात तिला योग्य ती मदत आणि मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. तर डॉ. म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने पेलण्...