Posts

Showing posts from August, 2024
Image
 आवाज कोकणचा / ठाणे  बदलापूर/ प्रतिनिधि  बदलापूरच्या रणरागिनी समाजसेविका प्रेरणा कुळकर्णी संतश्रेष्ठ श्री शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित.. . प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा सौ. दिप्ती उर्फ़ प्रेरणा वैभव  कुलकर्णी यांचा जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन तर्फे राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज व उत्कृष्ट नाट्यलेखन व दिग्दर्शक 2024 पुरस्कार देऊन सन्मान               जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन तर्फे दिनांक 30/08/2024 शुक्रवार रोजी, कस्तुरबा हॉल , सेनापती बापट रोड ,पश्चिम माटुंगा येथे उत्साहात साजरा केला गेला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर अध्यक्ष धडक कामगार युनियन श्री.अभिजित दादा राणे,अध्यक्ष जनरल जंगल एम्पॉइज असोशिएशन श्री. नंदकिशोर खानविलकर , राष्ट्रीय अध्यक्ष जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन व आयोजक श्री.दिपक काळींगण व राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय महिला कामगार मंच सौ अनिला शुक्ला व दिग्दर्शक दत्ता जवळगे उपस्थित होते.  या कार्यक्रमात  प्रेरणा फाऊंडेशन संस्थापिका...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि/ उरण आवरे येथे रक्तदान शिबिर संपन्न डॉ. हिराचंद पाटील व तुकाराम गावंड यांचे मोलाचे योगदान ... पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.  अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून या रक्तदानाच्या शिबिराला सुरुवात झाली.  उरण तालुक्यातील वाढते औद्योगीकरण व मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक यामुळे या भागामध्ये अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. आज पर्यंत अनेक निष्पाप लोकांचे बळी या अपघातात गेले आहेत तर काही जन्मभरासाठी जायबंदी झाले आहेत . असे अपघात घडल्यानंतर अत्यंत तातडीने सर्वात अगोदर गरज भासते ती रक्ताची. अनेक मृत्यू हे अतिरक्तस्रावामुळे होत असतात रक्ताची ही निकड लक्षात घेऊन नांदाई प्रतिष्ठान वशेणीचे अध्यक्ष व सामजिक कार्यकर्ते डॉ. हिराचंद पाटील व सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरणचे अध्यक्ष तुकाराम गावंड यांनी एकत्र येत उरण विभागातील निसर्ग संस्था वशेणी , सारडे विकास मंच व कोमणादेवी ऑक्सिजन पार्क, जय जनार्दन क्रिएशन संस्था कासारभट, साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रो...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  पनवेल/ प्रतिनिधि  महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्रने पोलीस बांधव, एसटी कर्मचारी व दीव्यांग बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन सणाचे पावित्र्य जपले . पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचे सह अंग असलेली महिला उत्कर्ष समितीच्या राज्यभरातील महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन या दिनाचे औचित्य साधत आपल्या घरादारापासून , कुटुंबापासून दूर राहून जनसेवा करणाऱ्या एसटी ड्रायव्हर कंडक्टर तसेच "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य आपल्या खांद्यावर घेऊन अहोरात्र समाजात शांतता नांदावी, दुर्जनांचा काळ ठरावी अशा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना राखी बांधून बहिणीचे कर्तव्य पार पाडले.  गुहागर येथे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष दीप्ती साळवी , गुहागर तालुका अध्यक्ष सुवर्णा पागडे, उपाध्यक्षा विनाकाष्टे , अनुपमा पोरे यांच्यासह इतर सदस्यांनी गुहागर एसटी आगारातील उपस्थित चालक व कंडक्टर यांना तसेच गुहागर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा सण उत्साहात साजरा केला.  नवी मुंबई तुर्भे वाशी विभाग अध्यक्ष व...
Image
 आवाज कोकणचा  / नवी मुंबई  प्रतिनिधी  / कळंबोली रोडपाली येथे नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा युवा कार्यकर्ते योगेश पगडे यांचा पुढाकार.. नारळी पौर्णिमा म्हणजेच कोळी समाजातर्फे समुद्राची पूजा चर्चा करून व नारळ अर्पण करून कोळी राजाला मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी खवळलेल्या समुद्राला शांत होण्यासाठी प्रार्थना करण्याचा सोहळा.     पावसाळ्यापूर्वी समुद्र अशांत असतो अथांग लाटा , जोरदार पाऊस अशा खवळलेल्या समुद्रात हा कोळी राजा जात नसतो . नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राची यथासांग पूजा करून व त्याला नारळ अर्पण करून त्या दिवसापासून हा कोळी राजा मच्छीमारीसाठी तयार होतो.  आपली ही संस्कृती परंपरा कायम टिकून राहावी , येणाऱ्या नवीन  पिढीला त्याची माहिती मिळावी यासाठी रोडपाली गावचे युवा कार्यकर्ते, कोळी समाज मच्छीमार कृती समिती अध्यक्ष व कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश पगडे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.  कासाडी नदी खाडी किनारी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांना एकत्र आणत समुद्र पूजन व नि...
Image
आवज कोकणचा / गुहागर  प्रतिनिधी. दिनांक 12 ऑगस्ट 24   पत्रकार उत्कर्ष समिती गुहागर आयोजित मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप शिबिर संपन्न डॉ. दिनेश साळवी यांचे महत्त्वाचे योगदान पत्रकार उत्कर्ष समिती व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती गुहागरच्या वतीने वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे येथे मोफत डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला .  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मराठी पत्रकारितेचे प्रणेते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पत्रकार उत्कर्ष समिती गुहागर अध्यक्ष डॉ. दिनेश साळवी , सदस्य चंद्रकांत काष्टे, सुनील बोले , अंकुश पागडे , हिरालाल मोरीस, महिला उत्कर्ष समिती रत्नागिरी उपाध्यक्ष सौ दीप्ती साळवी , गुहागर तालुकाध्यक्ष सौ सुवर्णा पागडे , सचिव विना काष्टे,  समीक्षा बोले, वर्षा संसारे अनुपमा पोरे यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.  प्रसिद्ध...
Image
आवाज कोकणचा / अलिबाग राजेंद्र होलकर  महावितरण विरोधात झिराड विभागातील ग्रामस्थ आक्रमक...  अलिबाग- ग्रुप ग्रामपंचायत मान तर्फे झिराड ह्या गावातील विदयुत दबाव कमी असल्याने गावातील ग्रामस्थ त्रस्त होते त्या बाबतच्या अनेक लेखी तक्रारी देखील महावितरण कार्यालय अलिबाग येथे करण्यात आल्या मात्र, ह्या बाबतची कोणतीही दखल घेतली गेली नाही. विद्युत पुरवठ्याच्या अनियमितते मुळे गावातील वातावरण तणावाचे बनले, अनेक ग्रामस्थांच्या घरातील विद्युत पुरवठा कमी जास्त होत असल्याने विद्युत उपकरणे कायमची नादुरुस्त झाली. त्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. सदर बाब लक्ष्यात घेऊन गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन सर्व ग्रामस्थाना विश्वासात घेतले व महावितरण कार्यालय अलिबाग येथे मोर्चा काढला व  ग्रामपंच्यात मान तर्फे झिराड मार्फत विद्युत पुरवठा सुरळीत होई पर्यंत कोणतेही विद्युत बिल ग्रामस्थ भरणार नसल्याचे रीतसर पत्र महावितरण कार्यालय अलिबाग येथे सादर करण्यात आले. सदर कामाची दखल घेऊन महावितरण कार्यालय अलिबाग यांनी शक्य होईल तेवढ्या लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आश्वासित करून...
Image
 आवाज कोकणचा    पेण / अरूण चवरकर जनता हायस्कूल गडब च्या एस एस सी ८६ विद्यार्थ्यांचा स्नेहबंध सोहळा संपन्न.... पेण तालुक्यातील जनता हायस्कूल गडब चे १९८६ बॅचचे  विद्यार्थी अतिशय गरिबीतून शिक्षण घेऊन मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवत आता हे वयाची 53 वर्ष पूर्ण केले आहेत तरी त्यावेळची भौगोलिक परिस्थिती वर मात करून त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे एकत्र आले होते आणि वर्षातून एकदिवस वर्ग मीत्रांन साठी सर्व काम बाजूला ठेवून आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रात शैक्षणिक, राजकीय अनेक क्षेत्रातआपले नाव लौकीक करीत आहेत ते आज पेण मधील पाबळ निसर्ग रम्य ठिकाणी फार्म हाऊसवर साजरा करताना ह्याच ग्रुपचे माजी रायगड जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे व त्यांच्या पत्नी कै. जोती संजय जांभळे (जिल्हा परिषद सदस्य) यांना देवाज्ञा झाली त्यांना व ह्याच ग्रुपची विद्यार्थीनी मंजूला चवरकर यांच हि निधन झाले यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली . सुरवातीला जांभळे यांनी सतत तीन वर्षे स्व खर्चाने विद्यार्थ्यांना एकत्र केले नंतर जांभळे यांनी आज आपले मनोगत व्यक्त केले तेव्...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई उलवे / प्रतिनिधि  स्वराज्य मित्र मंडळ शेलघर तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती   नवी मुंबई उलवे नोड  गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील शेलघर गावचे सामाजिक कार्यकर्ते व स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक  श्री अविनाश मोतीराम भगत यांनी आपले सहकारी व मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रशांत भगत व आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हा परिषद शाळा शेलघर व जिल्हा परिषद शाळा जावळे या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  शेलघरचे जेष्ठ नागरिक श्री. अमृतशेठ भगत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.   ज्ञानाची देवता देवी सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून व शेलघर चे सुपुत्र दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्वराज मित्र...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई  प्रतिनिधी / उरण  नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त  ९५ गावांतील गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर - महासंघाचा पाठपुरावा.. नवी मुंबईतील सिडको प्रकल्पग्रस्त 95 गावांतील प्रकल्पग्रस्तांनी मुळ गावठाणाबाहेर गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे,निदर्शने,पत्रव्यवहार याद्वारे   याबाबत शासनाकडे सदरहू घरे नियमित करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे शासनाने दि 25.02.2022 रोजी सुधारित जीआर काढून प्रकल्पग्रस्तांना काही प्रमाणात दिलासा दिला. त्यातही आणखी सूट मिळावी/सुधारणा व्हाव्यात यासाठी प्रकल्पग्रस्त प्रयत्नशील होते. प्रकल्पग्रस्तांच्या या न्याय्य मागण्यांसाठी 'नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघा ' तर्फे सिडको कार्यालय आणि मंत्रालयावर दोन मोठी निदर्शने झाली. त्यात हजारो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दि 11 मार्च 2024 रोजी महासंघाच्या नेतृत्वाखाली  सिडको प्रकल्पग्रस्त प्रथमच मंत्रालयावर चाल करून गेले. त्यामुळे शासनाला या आंदोलनाची दखल घ्य...
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  जि. मा. का. अशोक म्हात्रे  ज्येष्ठांची काळजी घेणारी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” 65 वर्षे व पुढील वृद्धांसाठी योजना... मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11 कोटी 24 लाख असून त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण 1 कोटी 50 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. *योज...
Image
 आवाज कोकणचा /  नवी मुंबई  उरण - पुजा चव्हाण  बी.एम.टी.सी. कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे उपोषणावर ठाम ... बी. एम. टी. सी कामगारांच्या ४० वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बी.एम.टी. सी कामगारांनी ९ ऑगस्ट २०२४ रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिला होता. सिडको महामंडळाची तत्कालीन बीएमटीसी परिवहन सेवा काही अधिकारी, कर्मचारी आणि तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे देशोधडीला लागली. त्यानंतर ४० वर्षापासून या कामगारांचा लढा सुरूच आहे. बीएमटीसी कामगारांना सिडकोकडुन १० बाय १० चे एकञित भुखंड तसेच थकीत नुकसानभरपाई मिळेल असा निर्णय १० जुलै २०१३ रोजी झाला होता. १८०० कामगारांवर बेकारीची कु-हाड नवी मुंबई शहराची निर्मिती करताना १९७४ मध्ये बीएमटीसीची दादर ते पनवेल अशी पहिली बससेवा सुरू झाली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यानंतर टप्याटप्याने २७० हून अधिक बस वाशी, घणसोली, ऐरोली, रबाले, ठाणे आणि बेलापूर या परिसरात धावत होत्या. तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे ९ फेब्रुवारी १९८४ मध्ये ही बससेव...