
आवाज कोकणचा / पुणे लोणावळा / अशोक म्हात्रे आई एकविरा भक्तांना टोल माफी - एकविरा भक्त जयेंद्र दादा खुणे यांच्या प्रयत्नांना यश श्री एकविरा चैत्र यात्रानिमित्त पालखी प्रमुख व स्वयंसेवकांची नियोजन बैठक संपन्न.. _____________________ श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट आयोजित चैत्र सप्तमी गुरुवार दिनांक ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत देवींची यात्रा असून दिनांक ४ एप्रिल २०१४ रोजी देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न होणार आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आई एकविरा देवीची महती जगविख्यात असून आगरी, कोळी, सिकेपी व इतर समाजाची एकविरा देवी कुलस्वामिनी आहे . पालखीला व यात्रेला दरवर्षी लाखो भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात . श्री एकविरा देवीची यात्रा व पालखी सोहळा निमित्त चैत्र सप्तमी यात्रा व पालखीचे औचित्य साधून श्री. किशोर धुमाळ ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक ) यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जयेंद्रदादा खुणे ( अध्यक्ष श्री एकविरा देवी भक्त भाविक मंडळ, महाराष्ट्र राज्य ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी प्रमुख व स्वयंसेवकांची नियोजन बैठक लोणावळा पोलीस ठाणे येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये श्री. क...