Posts

Showing posts from June, 2023

आरोग्य वारी_पंढरी च्या दारी "

Image
  पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनची  "आरोग्य वारी - पंढरी च्या दारी " आवाज कोकणचा/आरती पाटील           पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही नेहमी समाजहिताच्या कार्यासाठी अग्रेसर असते पंढरपूरच्या वारी साठी आलेल्या  वारकऱ्यांसाठी पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.वैभव मोकल यांच्या अध्यक्षतेखाली गोपाळपूर पंढरपूर येथे आरोग्य शिबिर घेण्याचे  ठरवण्यात आले त्यासाठी मागील आठवड्यापासून सर्व डॉक्टरांनी मेहनत केली.जे डॉक्टर वारी साठी येणार नव्हते त्यांनी शिबिरा साठी  मेडिसिन देवून सहकार्य केले. शिबिरा साठी निघालेल्या गाडीला  डॉ. गुणे सर,श्रीमती भारती नाईक  व डॉ.वसंत पाटील यांनी श्रीफळ अर्पण करून,सर्व सेवाभावी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या व शिबिर पूर्णपणे यशस्वी करावे व त्याचा लाभ वारकऱ्यांना व्हावा असे मार्गदर्शन केले. व ते आज त्यांनी केलेली मेहनत पंढरपूरच्या वारीला आलेले वारकरी यांना आरोग्य सेवा देऊन सफल झाली. या शिबिरासाठी पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या महिला डॉक्टर सुद्धा उपस्थित होत्या असोसिएशनच्या दिलेल्या सेवे...

विठ्ठल रुक्मिणी पायी पालखी सोहळ्याचे इंदापूर मध्ये जोरदार स्वागत

Image
  विठ्ठल रुक्मिणी पायी पालखी सोहळ्याचे इंदापूर मध्ये जोरदार स्वागत आवाज कोकणचा/जगदीश महाराज सार्डेकर पनवेल वरून निघालेली पालखीचे इंदापूर नगरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले पनवेल ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह भ प गणेश महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सालाबाद प्रमाणे यावर्षी पालखीच्या आयोजन करण्यात आले होते हा टप्पा पार करत असताना बऱ्याच ठिकानी पालखीचे स्वागत होत होते पालखी इंदापूर नगरीमध्ये प्रवेश केली पालखीमध्ये बरेच भाविक सहभागी झाले आहेत   या पालखीचे नियोजन उत्तम तसेच वस्तीचे ठिकाण हे व्यवस्थित उपलब्ध करून ठेवले होते असंख्य भाविक आज इंदापूर मध्ये दाखल झाले हे सर्व होत असतानाच ह भ प जगदीश महाराज सार्डेकर यांनी तुळशीबाग येथे कीर्तन सेवा दिली व त्या कीर्तन सेवेचा सर्व भाविकांनी लाभ घेतला.
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधी नवी मुंबई पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण व ज आ भगत ज्युनिअर कॉलेज गव्हाण येथील 80 टक्के व त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आज संपन्न झाला रयत शिक्षण संस्थेच्या या शाळेने नेहमीच आघाडी घेतली आहे. मागील अनेक वर्ष शंभर टक्के निकाल या शाळेने दिला आहे.  इयत्ता दहावी व बारावी मध्ये 80 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आज समितीच्या वतीने गौरवण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे सचिव डॉक्टर वैभव पाटील यांच्यासह पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर स्मिता पाटील उपाध्यक्ष आरती पाटील सचिव एडवोकेट दिव्या लोकरे नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू उपाध्यक्ष वर्षा लोकरे उपास्थित होत्या.  शाळेचे चेअरमन अरुण शेठ भगत गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत ग्रामपंचायत सदस्य उषा देशमुख कामिनी कोळी व त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या यावेळी बोल...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनीधी आशीष चौधरी उलवे नोड सेक्टर 16 मध्ये बिल्डर कडून फसवणूक झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप..... नवी मुंबई विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उरण पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून त्या मोबदल्यात साडेबारा टक्के विकसित भूखंड ही योजना राबवली या योजनेअंतर्गत मिळालेले भूखंड येथील शेतकऱ्यांनी विकसित करण्यासाठी बिल्डरांना दिले. अगोदर गोड बोलून शेतकऱ्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे करारनामे करून सिडको कडून भूखंड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कागदांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन सदर भूखंड प्राप्त करण्यात आले परंतु करारनाम्यामध्ये ठरलेल्या अटीप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला अथवा फ्लॅट न देता परस्पर हक्क पत्र घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.  असेच एक उदाहरण सेक्टर 16 उलवे नोड येथे उघडकीस आले असून शेतकरी रवी ठाकूर यांनी त्यांचा 400 चौरस मीटरचा भूखंड नवी मुंबई स्थित अमन डेव्हलपर्स चे बिल्डर मनोज कुमार सिंग या बिल्डरला विकसित करण्यासाठी देण्यात आला.  सदर भूखंडावर मनोज कुमार सिंग यांनी चार मजल्याची बिल्डिंग उभी केली व अगोदर ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या फ्लॅटच्या चाव्या त्यांच्या ताब्या...
Image
 आवाज कोकणचा /  प्रतिनिधी दिनाक  24  जून 2023 गौतम सोनवणे यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या खालापूर उपाध्यक्षपदी निवड पाताळगंगा टाइम्स चे संपादक श्री गौतम सोनवणे यांच्या वृत्तपत्राचा आज वर्धापन दिन या दिनानिमित्त विभागातील महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  या कार्यक्रमासाठी श्री संदीप मुंढे , किसन पारिंगे, अभिनेत्री सिद्धी कामथ , अभिनेता सिकंदर सय्यद , पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे,  सचिव डॉ. वैभव पाटील खालापूर अध्यक्ष चंद्रकांत मुंढे,  कार्याध्यक्ष राजु नायक,  समाजसेवक प्रकाश शेठ गायकवाड यांच्यासह विभागातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी श्री सोनवणे यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या खालापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले त्यांच्या या निवडीने उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Image
 आवाज कोकणचा / प्रतिनिधी आशिष चौधरी मध्य रेल्वेच्या पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात केली मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि घर-संरक्षण व्यवस्थापन (EnHM) विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात माननीय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जातात. मध्य रेल्वेकडे सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत ज्याद्वारे दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते जी वाढत्या जलसंकटावर शाश्वत उपाय म्हणून येते तसेच प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर स्वच्छतेसाठी वापरले जाते जसे की ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे इत्यादी आणि पिण्यायोग्य कारणांसाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी नाही २०२२ मध्ये, १५७५ किलोलिटर प्रतिदिन (KLD) पाणी तयार करण्याच्या क्षमतेसह १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत ज्यात- • लोकमान्य टिळक ...
Image
 आवाज कोकणचा / जि. मा.का. आषाढी एकादशी कालावधीत वारकऱ्यांना टोल माफी राज्य सरकारचा स्तुत्य उपक्रम आषाढी एकादशी-२०२३ करिता पथकर सवलत प्रवेशपत्रासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन अलिबाग,दि.19 (जिमाका):- शासनातर्फे दि.१३ जून ते दि. ०३ जुलै २०२३ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच पथकरातून सूट देण्यासाठी आषाढी एकादशी २०२३ करिता पथकर सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. ही सवलत पास/स्टीकर्स दि.१३ जून ते दि.०३ जुलै २०२३ पर्यंत वेळ सकाळी ९.०० ते रात्री १०.०० या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.        पथकर सवलत पासेस देण्याकरिता या कार्यालयात विशेष कक्ष निर्माण करण्यात आला असून महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते (उदा. मुंबई मधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा- कोल्हापूर ते राज्य सिमेपर्यंतचा महामार्ग इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला...

पत्रकार उत्कर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न...

Image
  आवाज कोकणचा /  प्रतिनीधी पत्रकार उत्कर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न...... पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधत  राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.   आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे मान्यवरांच्या  उपस्थित मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या या सोहळ्यास मराठी मुद्रण परिषद महाराष्ट्र अध्यक्ष  बाळासाहेब अंबेकर ,  मा. व्हि.. एस. म्हात्रे . निवृत्त सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मा.बाळासाहेब पाटील माजी राज्यमंत्री मा. म्हाडाअध्यक्ष,  पनवेल महानगर पालिका माजी  नगराध्यक्षा चारुशिला घरत, गायक दादुस संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत  श्री गणेशाचे पूजन करून दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.     पत्रकारिता क्षेत्रांत आयुष्य व्यतीत केलेले  अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे व पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना  जीवन गौरव पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले तर प्रिंट मि...
Image
आवाज कोकणचा  उरण ( प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून )   श्रेया भोसले शालांत परीक्षेत उरण मधून प्रथम कॉलेजकट्टा.....       महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयता 10 च्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत  95 टक्के गुण मिळून कु.श्रेया नारायण भोसले  केवळ सेंट मेरी विद्यालय जेएनपीटी मधून प्रथमआली असून ती तालुक्य मधूनही प्रथम येण्याचा मान तिने पटकाविला आहे.         .मूळ सोलापूर तालुक्यांतील राहणारी श्रेया भोसले आपल्याआई वडिलांसोबत उरण येथे राहत आहे. वडील नारायण भोसले हे पेशाने ब्रदर म्हणून जेएनपीटी  रुग्णालयात काम करीत आहे तर आई ही शासकीय सेवेत परिचारिका म्हणून कार्यरत आहे.घरात आई वडील दोन्हीही उच्चशिक्षीत असल्याने श्रेयाला घरातूनच चांगले मार्गदर्शन मिळाले मुळातच अभ्यासात हुशार असल्याने सेंटमेरी विद्यालयांतील शिक्षकांनी सुरवाती पासूनच तिला चंगले मार्गदर्शन केले त्याच बरोबर ती जात असणाऱ्या अग्रवाल क्लासेसच्या शिक्षकानी तीच्या अभ्यास कडे जातीने लक्ष दिले परिणामी श्रेया भोसले हिने चिकाटीने आणि नियोजन पद्धतीने अभ्य...

लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदारसंघाची धुरा

Image
  लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मावळ मतदारसंघाची धुरा पनवेल/प्रतिनिधी पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा आज (गुरुवार, दि. ०८) केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची धुरा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघात उरणसाठी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पनवेलसाठी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील तर अलिबागसाठी दक्षिण रायगड उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप- शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महाविजय अभियान २४ चे प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मा...
Image
 आवाज कोकणचा / प्रतिनीधी शैलेश ठाकूर  कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कामोठे येथे 7 जून रोजी कराटेचे  प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. त्यावेळी  दिनांक 4 जून रोजी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय सीनियर वर मास्टर स्पर्धेमध्ये रायगडच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत 12 सुवर्ण पदक,11 रजत, 8 कास्य पदक व प्रथम उपविजेता चषक पटकावून  जिल्ह्याचे नाव  उंचावले.  तसेच रायगड जिल्ह्यामधून कामोठे शहरातून रिताशा जयप्रकाश सुर्वे हिने म्युझिकल  फॉर्म मध्ये सुवर्णपदक,लाईट कॉन्टॅक्टमध्ये रजत पदक मिळवत पंजाब जालंदर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड निश्चित केल्यामुळे शाळेचे चेअरमन माननीय श्री. जयदास गोवारी सर, शाळेचे मुख्याध्यापक टी. एस. चाळके सर, आणि जनार्दन गोवारी सर, यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन करून  शुभेच्छा दिल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष व प्रशिक्षक शैलेश ठाकूर...
Image
 आवाज कोकणचा / प्रतिनीधी पुजा चव्हाण उरण  सी,आय,टी,यु संघटनेच्या अंतर्गत उरण मध्ये कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापन. उरण दिनांक६ जून २०२३ (पूजा चव्हाण )कोकण किनारपट्टीवर असलेल्या मच्छीमार बांधवांच्या न्याय हक्कासाठी सी.आय. टी.यू च्या अंतर्गत कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना करण्यात आली असून मच्छीमारांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच विविध मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्व मच्छिमार बांधवांनी एकत्र येत कोकण किनारा मच्छीमार संघटनेच्या शाखा गावोगावी, प्रत्येक ठिकाणी स्थापन करा असे आवाहन अखिल भारतीय सी. आय. टी. यू चे अध्यक्ष के. हेमलता यांनी केले. 6 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप येथे मच्छिमारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना करण्यात आली असून यावेळी के. हेमलता यांनी मच्छिमारांना मार्गदर्शन केले.कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमार बांधव व मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेले जहाज, बोट,नौका वाहक चालक कामगार, मच्छी विक्रेते आदींची संख्या क...
Image
 आवाज कोकणाचा / प्रतिनीधी  जगदिश क्षीरसागर  - पनवेल सेंट मेरी शाळा सुकापुर समोरील उघड्या गटारामुळे पालक वर्ग चिंतेत नवीन पनवेल येथील सेंट मेरी शाळा ही सुकापुर ग्रामपंचायत हद्दीत येते, या शाळेसमोरून एक मोठा नाला वाहतो. तेथे शाळा भरतेवेळी व शाळा सुटते वेळेस पालक वर्गाची खूपच गर्दी होते. दरवर्षी पावसाळ्यात या गटारात पडून पालक व विद्यार्थी जखमी होतात बाजूलाच पनवेल माथेरान हा रहदारीचा रस्ता आहे.  शाळा सुटल्यानंतर पालक मुले नेण्याकरता शाळेसमोर येतात तेव्हा त्यांची अवस्था इकडे विहीर तिकडे आड असे होते; का तर पुढे गेले तर गटारात पडायची भीती मागे थांबलं तर वाहनांने अपघात होण्याची भीती. येथे सारखे लहान-मोठे अपघात होत असतात म्हणून सर्व पालकांनी ही बाब शाळेच्या निदर्शनास आणून दिले पण काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पालकांनी ही बाब मनसेचे सुकापुर विभागीय अध्यक्ष राज क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा मनसे विभाग अध्यक्षांनी शाळा प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी चर्चा केली पण आतापर्यंत काहीही तोडगा निघाला नाही.  शाळेला उन्हाळी सुट्टी होती तेव्ह...
Image
  आवाज कोकणचा  / प्रतिनीधी उरण  पूजा चव्हाण  उरणकरनो तुम्ही खात असणारे चिकन सूरक्षीत आहे का ? थंडी आणि उन्हाळा असा समिश्र मौसम त्यात लग्नसराइचा हंगाम त्यामुळे सध्या मटन आणि चिकन वर खवय्ये ताव मारताना दिसत आहेत.परंतु आपल्या ताटांतील चिकान मटण कितपत सुरक्षित आहे ? याचे भान खवय्यांना नाही. नुकतेच महाराष्ट्रासह अन्य 9 राज्यात बर्डफ्लूने आपले फंख पसरवीले आहेत तर अन्य काही राज्यात पक्षी बर्डफ्लू च्या संसर्गाने मृत्यूमुखी पडत आहेत त्यामुळे कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.आज उरणात 250 पेक्षा अधिक चिकनची दुकाने आहेत या दुकानांवर स्थानिक आरोग्य संस्थेसह फूड सेफ्टी अँड स्टांडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया, अन्न व औषध प्रशासन पशुपालन विभाग स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी ढाराढूर झोपलेले आल्याने जनतेला नाईलाजाने आरोग्याला बधित करणारे चिकन मटन खवे लागत असल्यने जनते मधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात शहरत 150 ते 200 पेक्षा अधिक चिकनची दुक्ने आहेत तर 15 ते 20 मटणाची दुकाने आहेत,तर ग्रामिण भागात सर्वसाधारणपणे 1 मटणाचे तर 2 चिकनविक्रीची दुकाने आहेत या दुकानाची स्थिती पह...