Posts

Showing posts from March, 2024
Image
आवाज कोकणचा / मुंबई प्रतिनिधी दि . २१ मार्च २४ चतुरस्त्र अभिनेत्री सिद्धी कामथ यांची काँग्रेस सांस्कृतिक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुख पदी निवड...  चित्रसृष्टीतील आघाडीची नायिका चतुरस्र अभिनेत्री सौ. सिद्धी कामथ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार प्रमोद मोरे यांनी काँग्रेस पक्ष सांस्कृतिक सेलच्या महाराष्ट्र कार्यकारी प्रमुख पदी निवड जाहीर केली आहे. सौ सिद्धी कामथ या चित्रपटसृष्टीसह सामाजिक क्षेत्रात तसेच महिलांच्या हितासाठी नेहमीच हिरीरीने काम करत असतात. त्यांच्या या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन हि निवड करण्यात आली आहे. सौ सिद्धी कामत यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे . पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे व महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. 
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी १९ मार्च २३  विद्यार्थिनी व महिला पालकांसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आय. एम. ए. एस.ए . महाराष्ट्र् अध्यक्ष शैलेश ठाकुर यांचा उपक्रम... इंडियन मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एम.बी.एम. गोल्डन स्कूल पेंधर , श्रीमती. बारकुबाई नामदेव पाटील प्रयेश मराठी - इंग्लिश मिडीयम स्कूल व रिसर्च सेंटर रोडपाली, सेंट जोहान स्कूल पलस्पे, महाराष्ट्र एज्युकेशन पब्लिक स्कूल कळंबोली, निरंकारी भवन कामोठे या सर्व ठिकाणी पोक्सो कायदा, सायबर क्राईम ( मोबाईल वरून होणारे फ्रॉड, सेल्फ डिफेन्स मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी कळंबोली पोलीस स्टेशन चे सायबर एक्सपर्ट सुदर्शन सारंग सर, विजय कांबळे, कामोठे पोलीस स्टेशन किरण राऊत, कांगणे मॅडम, सुतार मॅडम पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, असोसिएशन अध्यक्ष बंडू शंकर पाटील, मुख्याध्यापक श्री.भरत म्हात्रे , समाजसेवक दशरथ पाटील, क्रीडा शिक्षक शिंदे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.   असोसिएशन म...
Image
आवाज कोकणचा / अलिबाग 16 मार्च 2024.  सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यालयाची वास्तू मोडकळीस कर्मचारी जीव मुठीत घेऊन करत आहेत काम..... सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यालय अलिबाग येथील बिल्डिंग नादुरुस्त झाली असून येथील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत अनेक ठिकाणी व भिंतींना तडे गेले आहेत कधीही एखादा अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही  संपूर्ण रायगड जिल्ह्यतून येथे जनता संस्था नोंदणी व तत्सम कामासाठी येत असते.  वेळीच प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर भविष्यात एखादा अपघात घडू शकतो प्रशासन याकडे लक्ष देईल का ?
Image
आवाज कोकणचा / मुंबई योगेश त्रिवेदी  विधिमंडळातील आर्थिक गैरव्यवहारावर झोड उठवून कारावास भोगणारे प्रकाश गुप्ते काळाच्या पडद्या आड ...   मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गुप्ते यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. २२ जुलै १९४१ रोजी जन्मलेल्या प्रकाश गुप्ते यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोईत्रा यांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले अशा आरोपावरुन त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. परंतु ऐंशीच्या दशकात अशाच प्रकारचा विधिमंडळातील आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणाऱ्या ख्यातनाम पत्रकार प्रकाश गुप्ते यांना सुमारे तीन महिने कारावास भोगावा लागला. एका ज्येष्ठ नेत्याने प्रकाश गुप्ते आणि अभय मोकाशी यांना विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले जातात अशी माहिती दिली. प्रकाश गुप्ते यांनी ती बातमी प्रसिद्ध केली. परंतु ही माहिती देणाऱ्या नेत्याने 'हात' वर केले. वर्तमान पत्राने सुद्धा प्रकाश गुप्ते यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी कचखाऊ धोरण स्वीकारले आणि दुर्दैवाने प्रकाश गुप्ते यांना हक्कभंग प्रस्तावाला सामोरे जावे लागले. सुमारे ती...
Image
आवाज कोकणचा / कुडाळ प्रतिनिधी - ७ मार्च २३ महिला उत्कर्ष समिती कुडाळच्या वतीने महिला दिन उत्साहात संपन्न... पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्ष तन्वी सावंत, उपाध्यक्ष सुस्मीता राणे , सचिव नेहा परब , सदस्य दीपा चव्हाण , रूपाली वरक , दीप्ती चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता. आपल्या हक्कासाठी लढलेल्या महिलांना त्यांचे अधिकार प्राप्त झाल्याच्या स्मृती प्रित्यर्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो . या दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कोकण विभाग अध्यक्ष सौ. ज्योतीका हरयाण , सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ. दीपा ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने करण्यात आली.  त्यानंतर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा जल्लोषमय कार्यक्रम साजरा झाला .  कोकण विभाग हा जंगल व हिरवाईने नटलेला प्रदेश आहे . तसेच या विभागांमध्ये वर्षभर रानभाज्या उपलब्ध असतात या भाज्या शरीर स्वास्थ्याला फायदेशीर ठरत असल्याने त्याची महती जनमानसात...
Image
  जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई येथे महिला उत्कर्ष समितीच्या महिलांच्या म्युझिक स्टुडिओचा शुभारंभ... आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी - 10 मार्च 24 नवी मुंबई येथील महिला उत्कर्ष समितीच्या सदस्या सौ. मीरा जाधव यांच्यासह अशोक डिका सुभाष कुमार यांनी एकत्र येत समितीच्या महिलांना गायन प्रशिक्षण वर्ग सुरू केला होता. या संगीत वर्गातून प्रशिक्षित होऊन तुर्भे विभाग अध्यक्ष वंदना अंबवले, राणी दळवी यांच्यासह अखिला शेट्टी , दिव्या शिंदे, वर्षा पाटील , प्रमिला सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नवी मुंबई विभागातील ज्येष्ठ कार्यतत्पर समाजसेविका कविता पाटील, अध्यक्षपदी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, ॲड. दिव्या लोकरे, ॲड. संगीता शेटे, मीरा जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. गायन क्षेत्रातील प्रचलित नाव असलेल्या अशोक यांनी उत्तम सूत्रसंचालन करत उपस्थित प्रेक्षक वर्गाला खीळवून ठेवले. गायिका राणी दळवी व दिव्या शिंदे यांनी द्वंदगीत गाऊन आपल्या जादुई आवाजाने...

श्रीकृपा सोसायटीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा.....

Image
  श्री कृपा सोसायटीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा..... पनवेल/आवाज कोकणचा, जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून श्रीकृपा सोसायटीतील महिलांनी एकत्र येऊन महिला दिन साजरा केला....     श्री कृपा सोसायटी महिला सदस्यांनी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यादरम्यान वेगवेगळे खेळ खेळण्यात आले .जेणेकरून महिला एकत्र येऊन त्यांचा रोजच्या जीवनात होणारा मानसिक त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातून महिला दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते.यात प्रामुख्याने महिला उत्कर्ष समितीच्या उपाध्यक्ष आरती पाटील व सोसायटीच्या सदस्य अर्चना देवकर यांचा अनमोल सहभाग होता. यांनी महिला दिन का साजरा करावा या संदर्भात थोडक्यात माहिती उपस्थित महिलांना दिली व आपण असेच एकत्र राहिलो तर आपली ताकद वाढेल व आपल्यासमोर येणारे कोणतेही काम आपण निर्भयपणे करू शकतो . असेच आपण एकत्र आलो तर प्रत्येक महिला मधला दुरावा दूर जाऊ शकतो. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन अक्षता पालकर विधी केळकर यांनी नियोजन फार उत्तम केले. या  दिनाचा औचित्य साधून सोसायटीतील सर्व महिला सहभागी झाल्या .जागतिक महिला दिन चा केक कापून साजरा करण्यात आला...
Image
 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समितीने केला सन्मान  ती च्या कर्तुत्वाचा... पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ.  स्मिता पाटील,   पत्रकार उत्कर्ष समिती खजिनदार व दिल्ली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवनाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक शैलेश ठाकूर, सहसचिव ज्ञानेश्वर कोळी यांनी महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत  खेलो इंडिया या देशपातळीवरील कराटे खेळामध्ये ब्राँझ , सिल्व्हर, गोल्ड यासारखी पदके मिळवलेल्या 21 कुमारी खेळाडू, तसेच ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेउन देशाच्या जडणघडणीत सहभाग नोंदवणाऱ्या प्रतीक्षा कोळी , वेदिका कोळी , हवाई क्षेत्रात उंच भरारी घेत हवाई सुंदरी बनलेल्या स्नेहा भगत या युवतींना सन्मानित करण्यात आले.  अग्रोली नवी मुंबई येथील शिव मंदिराजवळ आयोजित एका कार्यक्रमात अग्रोली येथील दानशूर ज्येष्ठ समाजसेवक श्री. गजानन पाटील, महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांच्या ह...

उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत प्रवेश

Image
  उरण येथील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश   मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पक्षात केले स्वागत..... प्रतिनिधी पूजा चव्हाण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील उरण येथील उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथे येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्या आधीच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट ठरल्यामुळे  हा मोठा धक्का जणू लागल्याचे समजले जात आहे. आज आपल्या दौऱ्याची सुरुवात उरण येथून करण्यापूर्वीच उरण मधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. यात उबाटा  पंचायत समिती सदस्य युवासेना तालुका प्रमुख दीपक ठाकूर, माजी सभापती चंद्रकांत पाटील, उबाठा गटाचे उलवे शहर प्रमुख, शाखा प्रमुख यांचा शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के साहेब, युवासेना राष्ट्रीय सचिव रूपेश पाटील व उरण विधानसभा पदाधिकारी यावेळी उपस्थ...

४ मार्च रोजी उरण येथे उध्दव ठाकरे यांचा झंझावाती जनसंवाद दौरा , (उबाठा गट ) रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर भोईर यांची माहिती.

Image
  ४ मार्च  रोजी उरण येथे उध्दव ठाकरे यांचा  झंझावाती जनसंवाद दौरा , (उबाठा गट ) रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर भोईर यांची माहिती. उरण/आवाज कोकणचा महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट ) ,कॉग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) , शेकाप, समाजवादी पार्टी आदी घटक पक्षांचे नेते , पुढारी यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खालापूर,उरण  या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४ मार्च रोजी तीन सभा होणार आहेत.  या झंझावाती जनसंवाद दौऱ्यात उरण विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या जनसंवाद मेळाव्याला माजी खासदार अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, संतोष वाघले पाटील, महाआघाडीतील शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, कॉग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, आर.सी.पाटील, राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे प्रशांत पाटील समाजवादी पार्टीचे अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतरही होऊ घातलेला व...

न्यू इंग्लिश स्कूल सुकापुर शाळेची विद्यार्थिनी निर्मिती दत्ता हिची खेलो इंडिया वुमन्स लीग 2024 साठी निवड...

Image
  न्यू इंग्लिश स्कूल सुकापुर शाळेची विद्यार्थिनी निर्मिती दत्ता हिची खेलो इंडिया वुमन्स लीग 2024 साठी निवड.. . पनवेल/आवाज कोकणचा अतिशय वेगाने विकसित होत असणाऱ्या पनवेल मधील सुकापुर येथील न्यू इंग्लिश स्कूल सूकापुर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी निर्मिती दत्ता हिची खेलो इंडिया वुमन्स लीग 2024 साठी तायक्वांदो खेळासाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे .  तसेच पांडिचेरी येथे पार पडलेल्या खेलो इंडिया तायक्वांदो वुमन्स लीग 2024 स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ पदक पटकावले आहे . अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल सुकापुर येथे शिक्षण घेत आहेत.  शाळेचे संचालक श्री निळकंठ पाटील हे  विद्यार्थ्यांप्रती घेत असलेल्या अविरत कार्यशैलीमुळे या शाळेचे विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवताना दिसत आहेत.  शाळेच्या संचालिका सौ अपर्णा पाटील ,पर्यवेक्षक श्रीमती रीना बिजू,  मुख्याध्यापिका सौ माधुरी म्हात्रे तसेच प्रशिक्षक श्री दिनेश या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन निर्मिती दत्ता हिला मिळाले आहे .  तिच्या या यशामुळे शाळे...