
आवाज कोकणचा / नवी मुंबई माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागाव,केगाव , म्हातवली शाळेत ओळखपत्र व गणवेश वाटप... उरण / पुजा चव्हाण दिनांक 29/7/2025 रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागाव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गणवेश , ओळखपत्र व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . या वेळी उरण तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांनी शिकवलेल्या धड्याचा आदर्श ठेवत 80% समाजसेवा व 20% राजकारण या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आज मराठी शाळेचे विद्यार्थी ही इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या सारखेच गणवेश परिधान करून त्यांच्या सारखे दिसावे तसेच त्यांच्या शाळेची ओळख देण्यासाठी व त्यांची ओळख पटावी म्हणून ओळखपत्रे , कंबर पट्टे , , टाय असे शालेय गणवेश सामानाचे वाटप यावेळी करण्यात आले. य...