
आवाज कोकणचा / नवी मुंबई पत्रकार उत्कर्ष समिती व स्वराज्य मित्र मंडळाचा उपक्रम लहानग्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप... शैक्षणिक साहित्य हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद.. पनवेल ता.२३ (बातमीदार अशोक घरत) पत्रकार उत्कर्ष समिती,महाराष्ट्र राज्य व स्वराज्य मित्र मंडळ शेलघर यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील रा.जि.प.शाळा कातकरी वाडी, खानावले येथील शाळेत इयत्ता १ली ते ५ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच गोड कॅडबरी चॉकलेटसही देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या सहशिक्षिका नयना ठोंबरे यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेतील बाल विद्यार्थ्यांकडून मान्यवरांसाठी स्वागत गीत गाण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शफिया शेख यांनी आपल्या प्रास्ताविक मधून विद्यार्थ्यांसाठी शासनाचे असलेले शैक्षणिक धोरण व काही उपक्रम आणि त्या उपक्रमांतर्गत त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि त्याचा वापर आपल्या शब्दांत मांडला. विद्या...