
आवाज कोकणचा / प्रतिनीधी झांकृती उपाध्याय / नवी मुंबई दिनांक 25 सप्टेंबर महावितरण उपविभाग नेरुळ चा श्री गणपती उत्सव उत्साहात.. महावितरण नवी मुंबई नेरुळ विभाग यांच्या मुख्य कार्यालयात गेली ४० वर्ष श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. महावितरणचे महानगर उपविभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी कुटुंबीयांसह एकत्र येवून हा उत्सव साजरा केला जात आहे. मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने महावितरण शिवाय परिसरातील नागरिक श्री गणेशाचे दर्शन घेतात. महाप्रसादासाठी हा एक आगळा वेगळा कार्यक्रम राबवला जातो ज्यामध्ये एक प्रणाली देखील आहे, ज्यामध्ये केवळ येथील कर्मचारीच नव्हे तर बाहेरचे लोकही महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात.