
आवाज कोकणचा नवी मुंबई हेमंत कोळी दिवाळे गावात रंगणार गजर भजनांचा *नवी मुंबई :* काळाच्या ओघात सोशल मीडियाच्या प्रगतीमुळे आज पारंपरिक भजन कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असले तरी, सर्वसामान्यांची आध्यात्मिक ओढ लक्षात घेता व वारकरी संप्रदाय मंडळांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नवी मुंबई येथील दिवाळे गावातील रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार ( ता. ०३ ) फेब्रुवारी रोजी 'भव्य संगीत सांप्रदायिक भजन' स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून, मुंबई, ठाणे व रायगडसह नवीमुंबई परिसरातील सुप्रसिद्ध भजन मंडळांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यावेळी विजेत्या तीन भजनी मंडळांना रोख पारितोषिक व पाच सर्वोत्तम वादकांसाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. टाळ, मृदूंग आणि पेटीच्या साथीने सादर होणारी भजनं, अभंग ही महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख आहे. मात्र शहरीकरणाच्या ओघात पारंपरिक भक्तीसंगीत, भजनं आणि अभंग आजवर केवळ मौखिक स्वरुपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आले आहेत. सामाजिक जडणघडणीमध्ये या कलेचा मोठा वाटा आहे. या ठेव्याची पुढील पिढीला ओळख व्हावी व अखंडित परंपरेचं जतन...