*श्री संप्रदयाचे सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल*
* श्री संप्रदयाचे सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल आवाज कोकणचा / वैभव पाटील दि नाक 25 फेब्रुवारी 22. जागतिक स्तरावर अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाज सेवेचा वारसा चालवणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांना शुक्रवारी (ता.२५) युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. या निमित्ताने श्री सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. धर्माधिकारी कुटुंबाने संपूर्ण जगात आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केले आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने व्यसनमुक्तीसाठी भरीव कार्य केल्यामुळे अनेक तरुण व्यसनमुक्त झाले असून सन्मार्गाला लागून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. जिल्ह्यसह राज्यात स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानच्या अतुलनीय सहभागामुळे स्वच्छ सुंदर रायगड जिल्हा ही संकल्पना यशस्वी होत आहे. गणेशोत्सव ...