
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणुन मान्यता जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय झाला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाने म्हटलें आहे.