Posts

Showing posts from March, 2023
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधि  ममता मसूरकर  2023  शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराने सन्मानित . मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवड पुणे ,दक्ष फाउंडेशन, महाराष्ट्र ,तसेच तेजस्विनी सामाजिक शैक्षणिक विकास संस्था - सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा आत्मनिर्भर लक्षवेध संमेलन पुणे येथे सायन्स पार्क हॉल येथे संपन्न झाला. विविध अशा लक्ष केलेल्या क्षेत्रात कर्तव्यम सत्कार सोहळ्यात ठाणे कळवा येथील सौ.ममता मसूरकर रायझिंग स्टार शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका सौ. तृप्ती देसाई मराठी बिग बॉस फेम तसेच माननीय गिरीश प्रभुणे सुप्रसिद्ध समाजसेवक तथा पद्मश्री भारत सरकार हे उपस्थित होते . ममता मसूरकर या कळवा परिसरात सातत्याने वैविध्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या सदर कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे.
Image
  आवाज कोकणचा / पनवेल प्रतिनिधी कु.आर्या सुधीर पाटील राष्ट्रीय भाषारत्न पुरस्काराने सन्मानित अखिल भारतीय राष्ट्रभाषा विकास समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा परिचय परीक्षेत कु.आर्या सुधीर पाटील हिस राष्ट्रीय भाषारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सदर स्पर्धा २२ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. आर्या सुधीर पाटील ही नवीन पनवेल तेथील सी.के.टी. विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यापूर्वीही तिला निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा यामध्येही पुरस्कार मिळालेले आहेत.आर्या पाटील हिस मिळालेल्या या यशा बद्दल तिचे सी.के. टी.विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण,पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी  तसेच पत्रकार उत्कर्ष समिती यास कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधि कल्याण ॲडवोकेट अनिशा फणसाळकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित  प्रेरणा फाउंडेशन चा पाचवा वर्धापन तीन दिनांक 25 मार्च 2023 रोजी कल्याण येथील प्र के अत्रे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सो प्रेरणा गावकर कुलकर्णी यांनी दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथींचा सन्मान व सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी प्रमुख अतिथि पैकी एक म्हणून एडवोकेट अनिशा फणसळकर यांचाही सत्कार  ,"राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार 2023" देऊन करण्यात आला. तसेच सदर प्रसंगी अनेकविध संस्था आणि व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला. तो करण्यासाठी एडवोकेट फणसळकर आणि अन्य अतिथींना संधी मिळाली. सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध संस्थांची हजेरी होती.
Image
  आवाज कोकणचा / ठाणे प्रतिनिधि: महिला उत्कर्ष समिती सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित प्रेरणा फाउंडेशन ने केला गौरव प्रदेश कार्याध्यक्ष सौ. श्रुति उरणकर यांनी स्वीकारला पुरस्कार...  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कार्याची दखल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था घेत असून काल कल्याण येथे पार पडलेल्या एका शानदार समारंभात प्रेरणा फाउंडेशन या संस्थेने महिला उत्कर्ष समितीला गोरगरिबांचा आधार सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरव केला.  महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुती उरणकर यांच्यासह सौ. सविता ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  आजपर्यंत महिला उत्कर्ष समिती महिलांसाठी करत असलेल्या एकूणच कार्य ज्यामध्ये सामाजिक बांधिलकी, महिलांवरील अन्याय, अत्याचार व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी केले जाणारे योग्य प्रयत्न , महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम या सगळ्याची दखल विविध क्षेत्रातून घेतली जात असल्यामुळेच आज समितीचे नाव महाराष्ट्रभर पसरले आहे.  समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरातून महिला उत्कर्ष...
Image
  आवाज कोकणचा / पनवेल प्रतिनिधी  महिला उत्कर्ष समितीतर्फे रोड रोमियोंवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश संघटक सौ नीता माळी यांनी पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कादबाने यांची भेट घेऊन रोड रोमियोंवर कारवाई करण्याची मागणी केली  पनवेल येथील वडाला तलाव परिसरात नगरपालिकेतर्फे अत्यंत सुबक व नियोजनबद्ध असे उद्यान व सुशोभिकरण करून नागरिकांना त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी चांगला उपक्रम राबवून विकास कामे केली आहेत. या तलावाच्या जवळच के. व्ही. कन्या विद्यालय व व्हीं. के. हायस्कूल अशा प्राचीन व महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. या परिसरात दररोज हजारो नागरिक येऊन आपले आरोग्य तंदुरुस्त रहावे याकरिता व फेरफटका मारण्यासाठी येत असतात परंतु अनेक वेळा शक्यतो शाळेच्या दुपारच्या सुट्टीच्या वेळेत काही समाजकंटक व युवक येथील शालेय विद्यार्थिनींना त्रास देण्याच्या व छेड काढण्याच्या उद्देशाने येऊन अश्लील चाळे करत शेरेबाजी करत . मोटरसायकल वर स्टंटबाजी व गाड्यांचे मोठ्या आवाजाच्या सायल्नसरणे आवाज करताना दिसत असल्याने...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधी नवी मुंबई *भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे गायत्री घुगे या महीला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित....!* मुंबई :- भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वर्गीय माधुरी दत्ताराम घुगे स्मृतिप्रित्यर्थ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु. गायत्री सरला दिनेश घुगे यांचा जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तसेच यावेळी लेखक मंगेश मसुरकर संग्रहित जेष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे यांच्या चरित्र ग्रंथ बायोस्कोपचे प्रकाशन देखील करण्यात आले. काल दि.१६ मार्च २०२३ रोजी मुंबईतील दहिसर पुर्व मधील विठ्ठल मंदिरातील स्वामी माधवेंद्र सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रमूख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी १० वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली. दत्ताराम घुगे यांच्या सौभाग्यवती स्व.माधुरी दत्ताराम घुगे यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गायत्री घुगे यांच्या सह समाजातील १८ अनेक महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गायत्री घुगे या गेल्या चार वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात काम करतं आहेत. खूप कमी वयात त्या...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी  राकेश देशमुख सकल मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश तर्फे भव्य कब्बडी स्पर्धा   जाणता राजा चषक व सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ चेआयोजन संस्थापक अध्यक्ष श्री अमरजी वाघ साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री आनंदजी सरवणकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री महेंद्रजी धामणसे साहेब यांच्या मार्गद्शनाखाली करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री अशोकजी धनावडे साहेब,महाड शहर पोलिस निरीक्षक श्री मिलिंदजी खोपडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री मनोजजी धामणसे साहेब, महाराष्ट्र युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य श्री विकासशेठ गोगावले साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री हनुमंतजी (नाना) जगताप साहेब, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस श्री बिपिनदादा म्हामुणकर साहेब, नगरसेवक श्री संदीप जाधव साहेब, समाजसेवक श्री प्रशांत मढवी साहेब, समाजसेवक श्री लादुलाल जैन साहेब,दिपक सावंत साहेब, श्री जयवंत दळवी साहेब, समाजसेवक राजेश येरुणकर, ...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधी   उरण मध्ये वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई. उरण -( वार्ताहर पूजा चव्हाण) आज दिनांक (13 मार्च 2022) रोजी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे, बिना हेल्मेट, बिना लायसन तसेच रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करणे वाहतूक नियमाचे पालन करणेअशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना वाहतुकीचे नियम सांगून कारवाई करण्यात आली होती. तसेच ही कारवाई उरण पालवी, राजपाल नाका, पेंशन पार्क,व उरण न्यायालयासमोरील परिसरात करण्यात आली होती. यावेळी ज्या दुकानांच्या समोर वाहने उभी राहतात त्यांना ती वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले आहेत, त्याच्या आत लावणे व सिंगल पार्किंग करावयास सांगावे असे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्याकडून दुकानदारास सूचना देण्यात आल्या.  तसेच जिथे पार्किंगचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत तेथेच आपली वाहने पार्किंग करावी नो पार्किंग मध्ये पार्किंग करू नये व अशा सूचना नागरिकांना यावेळी करण्यात आल्या त्यामुळे आज उरणमध्ये जी वाहतूक कोंडी होत आहे ती वाहतूक ...

ग्लोबल वार्मिंगचा समुद्र ठिकाणी होणारा परिणाम" या पथनाट्यातून सामाजिक वनीकरण विभाग व प्रिझम संस्थेच्या वतीने जनजागृती*

Image
  *" ग्लोबल वार्मिंगचा समुद्र ठिकाणी होणारा परिणाम" या पथनाट्यातून सामाजिक वनीकरण विभाग व प्रिझम संस्थेच्या वतीने जनजागृती* अलिबाग,दि.11/03/23 सामाजिक वनीकरण विभाग, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्लोबल वार्मिंगचा समुद्र ठिकाणी होणारा परिणाम" या विषयावर अलिबाग समुद्रकिनारी स्थानिकांच्या व पर्यटकांच्या उपस्थितीत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.        प्लास्टिकचा अतिवापर, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सूरू असलेली वृक्षतोड, मोठ-मोठ्या कंपन्यामधून सतत होणारे हवेचे प्रदूषण, वाहतुकीच्या साधनाच्या अति वापरातून उत्सर्जित होणारे घातक व विषारी वायू , विरळ होत चाललेला ओझोनचा थर, सतत लागणारे वनवे, नद्यामधील भराव यांसह अनेक कारणामुळे वातावरणातील तापमान वाढत जाऊन ग्लोबल वार्मिंगची समस्या अधिक तीव्र होत आहे. ज्यामुळे अनिश्चित पाऊस, सतत येणारी वादळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने किनारपट्टी लगतचे भूक्षेत्र पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असून किनारपट्टी लगतचे जनजीवन, पर्यटन यावर त्याचा विपरीत परिणाम होत आ...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधि  गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदतीच्या हातांची गरज- आमदार प्रशांत ठाकूर रोटरीच्या वैद्यकीय सेवांचा शुभारंभ पनवेल( प्रतिनिधी )- आर्थिक परिस्थितीमुळे आज अनेक जण उपचार घेत नाहीत,परंतु ज्यांना उपचार घ्यायचे आहेत अशा गरजूंच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचे हात पुढे आले पाहिजेत असे मत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल डायग्नोपेन यांच्यावतीने खांदा कॉलनी येथील रोटरी मेगा मेडिकल सेंटरमध्ये रोटरीच्या विविध आरोग्यसेवांच्या शुभारंभ प्रसंगी केले.            या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विलास कोठारी,डॉ.अनिल परमार,सतीश बनवट,प्रफुल्ल कोठारी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फित कापून डायलेसिस सेंटर,डायग्नोस्टिक सेंटर,दातांचा दवाखाना, सोनोग्राफी, रक्त तपासणी या कमीत कमी खर्चाच्या वैद्यकीय सेवांचा प्रारंभ करण्यात आला.         यापुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले,पनवेलचे ...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हा बैठक जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ओरोस येथे संपन्न पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची मीटिंग समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष ज्योतीका हरयान, कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे व वैभववाडी तालुका अध्यक्ष रश्मी रावराणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आले तसेच समितीच्या मागील अडीच वर्षातील कार्यावर चर्चा करण्यात येऊन लवकरच वेंगुर्ले दोडामार्ग व सावंतवाडी जिल्ह्यात समितीचे कार्य पोहोचवण्याचा मानस जिल्हाध्यक्ष ज्योतिका हरियाण यांनी व्यक्त केला. यावेळी मालवण तालुका अध्यक्षपदी पल्लवी तारी, सचिवपदी समृद्धी धारी यांची व वैभववाडी सचिव पदी प्राजक्ता रावराणे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी स्वरदा खांडेकर , दूर्वा मानकर, तन्वी सावंत, रुपा वरक , दीप्ती चव्हाण, मनीषा त्रिभुवने, नेहा परब, लीनाक्षी कदम, अनिशा पेडणेकर,...
Image
आवाज कोकणचा / सिंधुदूर्ग ज्योतीका हरयान   महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्गने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अंध कुटुंबाला दिला मदतीचा हात    नियतीपुढे हतबल झालेल्या अंध भक्ती गुरूनाथ सामंत यांच्या पतीचे दिड महिन्यापूर्वी ह्रदयविकाराने निधन झाले.ते सुद्धा अंध होते.परंतू ते दिव्यांगांसाठी सामाजिक स्तरावर काम करत होते.परंतू पतीच्या निधनानंतर भक्ती यांच्यावर कुटूंबाची मोठी जबाबदारी येऊन पडली.भक्ती यांना गायत्री आणि गौरव अशी दोन मुले आहेत.मुलगी गायत्री हिला सुद्धा नीट दिसत नाही.त्याचबरोबर दिड वर्षांचा गौरव याची आजच्या स्थितीत  दृष्टी चांगली आहे परंतू त्याची खात्री डॉक्टर देत नाही आहेत.त्यामुळे मोठा दुःखाचा डोंगर भक्ती यांच्यावर कोसळला आहे. हि गोष्ट महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांना समजताच ८ मार्च महिला दिनाचं औचित्य साधून महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या अध्यक्षा ज्योतिका हरयाण, कुडाळ तालुका अध्यक्षा दिपा ताटे, उपाध्यक्षा मनिषा त्रिभुवने, सचिव तन्वी सावंत, सदस्या सुश्मिता राणे यांनी भक्ती आणि त्यांच्या मुलांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करुन ...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी महिला उत्कर्ष समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती रायगड , नवी मुंबई विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत न्हावा शेवा पोलीस ठाणे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात महिला उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष सौ. रेखा घरत , नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू , उरण तालुका अध्यक्षा निर्मला पाटील, सदस्य श्वेता तांडेल यांच्यासह इतर सदस्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथील महिला पोलिस कर्मचारी मानसी तांबोळी, देवयानी घरत, कनिष्का नाईक, स्वाती देशमुख, अश्विनी कांबळे, रोहिणी जाधव, जेनिफर जयराज, शुभांगी पाटील, संचीता म्हात्रे, सुप्रिया ठाकूर यांना समिती तर्फे सन्मानित करण्यात आले.  यावेळी न्हावा शेवा पोलीस पोर्ट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ व त्यांचे सहकारी यांनी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध खेळांचे आयोजन केले होते. 
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी  पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे ज्येष्ठ समाजसेवक मा. प्रकाश शेठ गायकवाड साहेब यांची सदिच्छा भेट.  आज दिनांक 8 मार्च रोजी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष - डॉ. अशोक म्हात्रे, सचिव - वैभव पाटील, खजिनदार - शैलेश ठाकुर,कोकण सचिव- एकनाथ सांगळे, वरिष्ठ पदाधिकारी राजु नायक, चंद्रकांत मुंडे,या सर्व पदाधिकाऱ्यांनी मा. प्रकाश शेठ गायकवाड साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पत्रकार उत्कर्ष समितीचा होणारा पुरस्कार सोहळा 2023 व या समितीमध्ये त्यांचे सल्लागार म्हणून निवड करण्या विषयी चर्चा झाली.
Image
  आवाज कोकणचा / पुणे प्रतिनिधी गणेश कांबळे   तीन वर्षाच्या चुमुखीचा खून करणाऱ्या नराधम आई व तिच्या प्रियकरला अटक   तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून खून करणारी नरधम आई लक्ष्मी संतोष गवई वय 26 वर्ष व संतोष देवमन जामणी वय वर्षे 25 दोघेही राहणार खेरपुरी तालुका बाळापूर जिल्हा अकोला सध्या वैध वस्ती पिंपळे गुरव पुणे येथे त्यांना अटक करण्यात आले.  पोलीस सूत्रानुसार संतोष व लक्ष्मी हे एकाच गावातील असून त्यांचे पूर्वीपासूनच अनैतिक संबंध होते त्या दोघांनी गावातून पुण्याला पळून जाण्याचे ठरवले होते पुण्याला येत असताना लक्ष्मी हिने तिच्यासोबत दोन वर्षाच्या लहान मुलीला घेतले या कारणावरून रेल्वेमध्ये दोघांची भांडण झाली यामध्ये दोघांनी एक तारखेला मध्यरात्रीच्या प्रवासात तिचा गळा वळून खून केला दोन मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रोडच्या दरम्यान सीएफडी मैदानाजवळ दोन वर्षाच्या चिमुकल्या बालेकेचा मृतदेह सापडला होता या प्रकरणी खडकी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कोणाचा गुन्हा दाखल केला होता या घटनेमुळे खडकी व पुणे शहर परिसरात खळबळ उडाली होती पोलीस निरीक्षक गणेश माने यां...