Posts

Showing posts from October, 2022
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधि नवी मुंबई / दि. ३१ ऑक्टोबर २२ * ......................................................... * न्हावा शिवडी सेतू प्रकल्प बाधित मच्छिमार बांधवांची सभा संपन्न.. ... * ........................................................ * नवी मुंबईतील न्हावा ते मुंबईतील शिवडी येथे जोडला जाणारा बहुचर्चित सेतू प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आला आहे परंतु या प्रकल्पामुळे बाधित मच्छीमार बांधवांना अद्यापही मोबदला न मिळाल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. आज गव्हाण  कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  प्रकल्प बाधित युवा वर्ग व  बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्णय घेतला . या अगोदर या प्रकल्पातील प्रकल्प बाधित काही लोकांना मोबदला रक्कम एम.एम.आर.डी.ए. ने दिली आहे त्यासाठी शासनाकडून  काही निकष लागू केले होते परंतु छोट्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या परंतु शासनाकडे या मासेमारीची नोंद नसलेल्या शेकडो प्रकल्प बाधित जनतेला याचा फायदा मिळाला नाही. त्यामुळे येथील युवा वर्ग आक्रमक झाल...
Image
आवाज कोकणचा  / प्रतिनिधी  नवी मुंबई दि. २९ ऑक्टोबर २२ पत्रकार उत्कर्ष समितीने केला रांगोळी कलाकारांचा सन्मान रंगवल्ली कला दर्शनचे प्रमुख श्री. नंदकुमार साळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एन. आय . हायस्कूल उरण येथे भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले असून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.  या रांगोळी प्रदर्शनामध्ये उरण तालुक्यातील विविध कलाकारांनी सहभाग नोंदवला असून अतिशय सुबक आणि जिवंत वाटाव्यात अशा रांगोळ्या साकारल्या आहेत.  प्रामुख्याने नंदकुमार साळवी यांनी साकारलेला श्रीगणेश , सत्या कडू यांचा साईबाबा व स्वप्नाली मंचेकर आणि नवनीत पाटील यांनी साकारलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज या रांगोळ्या वास्तवात  जिवंत भासणाऱ्या असून लक्षवेधी आहेत.  पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी आज आपले सहकारी सचिव डॉ. वैभव पाटील, उरण तालुका सदस्या पूजा चव्हाण, महिला उत्कर्ष समिती रायगड अध्यक्ष रेखा घरत,  उरण तालुका अध्यक्षा निर्मला पाटील यांच्यासह प्रदर्शनास भेट देऊन आनंद लुटला.   या वेळीं नंदकुमार साळवी, सिद्धार्थ नागवेकर, सत्या कडू , नवनित ...
Image
मुंबई: दि.27 ( आवाज कोकणचाा / प्रतिनिधी :   महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष तसेच मुंबई वृत्तपत्र लेखक संघ सल्लागार वर्ल्ड पार्लमेंट सदस्य अमेरिका अधिक इतर संस्थेत पदभार असल्याने त्याचप्रमाणे आजवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कार्यक्षेत्रात पाच हजाराच्यावर कविता लिखित असल्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे त्यांचा काव्यसंग्रह चाळणीवाला महाराष्ट्र राज्य मराठी व संस्कृती मंडळाने मुख्यमंत्री यांच्याहस्ते 2013प्रकाशित केलेला आहे यासर्वबाबीचा विचार करून पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक समन्वयक अध्यक्ष राजेंद्र लकेश्री तसेच गुरूदत्त प्रतिष्ठान कामाठीपुरा येथे सर्व स्थानिक कार्यकर्ते व महाराष्ट्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते राजेंद्र लकेश्री यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीची माहिती दिली, कार्यक्रमातील उपस्थित पाहुण्यांची ओळख आनंद मुसळे यांनी करून दिली.  या प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितिच्या सुगंध उटण्याचे वाटप करण्यात आले, सन्मा-प...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  आशिष चौधरी ( उपाध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई )  २६ ऑक्टोबर ऐन दिवाळीत भारतीय खाद्य निगम लिमिटेड कळंबोली च्या गोडाऊनला भीषण आग.. भाऊबीजेची सुट्टी असल्यामुळे जीवित हानी नाही कळंबोली येथील भारतीय खाद्य निगम लिमिटेडच्या गोडाऊनला भीषण आग लागून आत मध्ये असलेल्या 50 किलोच्या तांदूळ बॅगा आधीच्या भक्षस्थानी पडल्या . आगीचे कारण अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे ही आग एवढी भीषण होती की नवीन पनवेल , खारघर, कळंबोली येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक  प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली . आज भाऊबीज असल्या मुळे येथे कामगार कामावर उपस्थित नव्हते त्यामुळे जीवित हानी झाली नाही आणि आग आटोक्यात आली असली तरी आगीचे कारण अद्याप  अस्पष्ट आहे.  यामागे काही घातपाताचा संशय  व्यक्त केला जात असून  याविषयी पोलीस खाते अधिक तपास करीत आहे.
Image
  पेण तालुक्यातील काराव ‌गडब ग्रामपंचायतीची पहिल्यांदाच होणार इतिहासात नोंद तिसऱ्यांदा होणार महिला सरपंच पेण, आवाज कोकणचा पेण, अरूण चवरकर पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हनून काराव गडब ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते पण पाच वर्षे आदिवासी सरपंच आरक्षण नंतर ओ बी सी राखीव महिला आरक्षण आता येणार सर्वसाधारण महिला आरक्षण बातमी समजताच ग्रामस्थांची झोपच उडाली असून लगेच ग्रामस्थ एकवटले आणि विचार विनिमय बैठका चालू झाल्या याच मुळ कारण दहा वर्षांत ग्रामपंचायतीची प्रगती झाली नाही याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला असून, सुशिक्षित,आय, टी, आय, तसेच डिप्लोमा झालेली मुले आज गावात उनाड फिरताना दिसतात. J.S.W. कंपनी मध्ये नोकरी मिळेल या आशेपोटी शिक्षण पूर्ण केले पण आज ही सर्व मुलं सुरक्षीत बेकार झाली आहेत, तेव्हा तरूण वर्ग सुध्दा पेटून उठलेला दिसतोय, तसेच जे एस डब्ल्यू कंपनी च्या सी एस आर फंडाचा फायदा काराव ग्रामपंचायतीच्या पेक्षा इतर ग्रामपंचायतींना झालेला ग्रामस्थ पाहत आहेत, शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, पावसाळ्यात तीन तीन दिवस ग्रामस्थ अंधारात आणि सामाजिक कार्यकर्ते वणवण भट...
Image
  आवाज कोकणचा/ अरुण चवरकर पेण गडब येथे दिपावली निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन आवाज कोकणचा / दिनांक 24 ऑक्टोबर 22 पेण ,अरूण चवरकर सहयोग मानव जनजागृती सामाजिक संस्था गडब पेण रायगड दिपावली निमित्त गडब पंचक्रोशी मर्यादित रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलं होतं या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परिक्षक म्हणून ह्याच गडब च्या शाळेत शिक्षण घेऊन उत्तम चित्रकार व एक उत्तम आगरी कवी ज्यांची ओळख गडब च नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवितात ते प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले असे कार्यक्रम वर्षांतून दोन तीन वेळा व्हायला हवेत म्हनजे अनेक कलाकारांना व्यासपीठ व मला कलाकारांना मार्ग दर्शन करता येईल कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील, राकेश मोकल,निळेश कोठेकर, महिंद्र कोठेकर, कल्पेश भोईर उपस्थित होते.
Image
  * आवाज कोकणचा / मुंबई * * राजेंद्र लकेश्री * ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ * पत्रकार उत्कर्ष समितीचा * * दिपावली निमित्त बहुजन स्नेह मिलन मेळावा संपन्न * * मुंबई दिनांक * * पत्रकार उत्कर्ष समिती, मुंबई शाखेच्या वतीने दिपावली निमित्त कामाठीपुरा विभागातील श्री. दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृहात बहुजन समाजातील लोकांचा एक आनंद मेळावा पत्रकार समितीच्या महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. * * प्रास्ताविक भाषण  समितीचे  मुंबई विभाग अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक श्री. राजेंद्र लकेश्री यांनी  करुन संस्थेच्या भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. * * कार्यक्रमातील उपस्थित पाहूण्यांची ओळख श्री. आनंद मुसळे यांनी करून दिली. * * या प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीच्या सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात आले, या वेळी सन्माननीय पाहुणे अँड. दिपरत्नाकर सावंत, अँड. मंदार चिखले, निवृत पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, पवार साहेब, डॉ. शैलेश ठाकूर, शिवसेनेचे सुनील कदम, शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. सुरेश शेट्टी, संतोष बंदरे, माजी नगरसेवक श्री.शाकिर अन्सारी इत्यादि मान्यवरांची उपस्...

महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना दिल्या शुभेच्छा...

Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि दिनांक  22 ऑक्टोबर  उटणे भेट देत  पोलिसांना महिला उत्कर्ष समितीकडून शुभेच्छा पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भटे साहेब यांची सदिच्छा भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीवेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष अशोक म्हात्रे नवी मुंबई उपाध्यक्ष आशिष चौधरी, महिला उत्कर्ष समिती  महाराष्ट्र सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे,  रायगड जिल्हा अध्यक्ष सौ रेखा घरतz  समितीच्या वरिष्ठ पदाधिकारी वर्षा लोकरे उरण तालुका अध्यक्षा सौ निर्मला पाटील सौ . योगसाधना पाटील,  गौरी अरविंद व जयश्री कांबळे उपस्थित होत्या .
Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ* *एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा* बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.  दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क...
Image
 मुद्रकांनी एकत्रित राहून समस्यांना निकाली काढलं पाहिजे- बाळासाहेब आंबेकर अकोला : महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या अंतर्गत अकोला जिल्हा येथे दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकारीणाच्या कोरोना काळानंतर पहिल्या सभेचे आयोजन होटल नैवेद्यम येथे करण्यात आले होते. या सभेच्या आयोजनाचा मान अकोला जिल्हा मुद्रक संघ अकोला यांना मिळाला होता.  सर्वप्रथम शेगांवचे संतगजानन महाराज याच्या प्रतिमेला हारार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व मुद्रण कलेचा शोध लावून ज्यांना सन १४२० मध्ये मुद्रण कला लोकांना समर्पीत केली असे जर्मनीचे जार्ज गुटनबर्ग यांचे प्रतिमेला सुध्दा हारार्पण करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तद्नंतर  उद्घाटन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष तथा जेष्ट पत्रकार श्री बाळासाहेब आंबेकर हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक श्री प्रकाश पोहरे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे संघटक श्री केशवजी तुपे , संभाजीनगर ,महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे सरचिटणीस  श्री ...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई अशोक म्हात्रे ( १६ ऑक्टोबर २२) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *आवाज कोकणचा तर्फे जनजागृती हेतू प्रसारित* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖          सध्या अनेक ठिकाणी लहान मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याच्या बातम्या येत असतात  काही ठिकाणी  अनोळखी व्यक्तींना चोर समजून मारहाण किंवा जिवे मारण्याच्या घटना घडल्या आहेत .   अशा संशयित व्यक्ती आढळून आल्यास ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्यात याबाबत माहिती देवून सदर व्यक्ती अथवा व्यक्तींना पकडुन पोलिसांच्या ताब्यात द्यावे. स्वतः कुठल्याही प्रकारची मारहाण करू नये.    सनी चव्हाण नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ नवी मुंबई उलवे न्यूजचे संपादक श्री.आशिष चौधरी यांनी त्यांच्या बातमीपत्रत  दाखविला आहे . ज्यामध्ये पारराज्यातील काही लोक लहान मुलांना चोरून नेऊन त्यांची विक्री करत असल्याचा जबाब सदर चोरांनी दिला आहे  सर्वसामान्य जनतेस या द्वारे असे आवाहन करण्यात येत आहे की कृपया आपल्या परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती व त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यास संपर्क करून अशा व्यक्तींची माहिती त्यांना द...

शिक्षणाचे महत्व

Image
  शिक्षणाचे महत्व जिद्द आणि कष्ट हे दोन  महत्वाचे पाऊल आहेत आजच्या आधुनिक  युगात यश मिळविण्यासाठी हे युग अतिशय स्पर्धेचे आहे जो टिकला तो यशस्वी झाला हे अल्लाउद्दीन शेख या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाने करून दाखविले.शेख नुरमोहोमद हे बीड जिल्ह्यातील देवी निमगाव या खेडे गावात राहतात त्यांचा धाकटा मुलगा शेख अलाउद्दीन याने एम एस इ बी च्या कनिष्ठ अभियंता स्पर्धा परीक्षेत पन्नास उमेदवारांत यश संपादन केले. हे आजच्या तरुण पिढीस दाखविले की प्रयत्न जिद्द आई वडिलाचे आशीर्वाद व परमेश्वराची आराधना हे ज्या वेळेस एकत्र येतात त्या वेळेस आपले यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .त्याच्या या यशात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक पदी श्री सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारला

Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई दिनांक १५ ऑक्टोबर २२ ------------------------------------------------------------------------------------ रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक पदी श्री. सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती. भारतीय पोलिस सेवेतील श्री. सोमनाथ घार्गे यांची रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. ते या अगोदर बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी कार्यरत होते.  रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक पदी असलेले श्री. अशोक दुधे यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश निघणार असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. . श्री. सोमनाथ घार्गे यांनी रायगड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे मावळते पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांच्याकडून स्वीकारली.      हसतमुख, शांत,संयमी मात्र कणखर शिस्तीचे, कर्तव्यतत्पर, संवेदनशील, मैत्री भावना जपणारे पोलीस अधीक्षक अशी ओळख निर्माण केलेले माजी पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे व नुकताच कार्यभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!💐🌹
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई १४ ऑक्टो. २२ /  आशिष चौधरी  (उपाध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई )  उपाध्यक्ष ---------------------------------------------- * वर्ल्ड पोस्ट डे निमित्ताने विवीध कार्यक्रमांचे आयोजन * ----------------------------------------------      * ९ ऑक्टोबर वर्ल्ड पोस्ट डे" * साजरा केला जातो त्या अंतर्गत 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत * "नॅशनल पोस्ट विक" *   साजरा केला जातो.     दिनांक १२ ऑक्टोबर रोजी या निमित्ताने दादर पोस्ट ऑफिस ने पोस्ट मास्तर जनरल "श्रीमती स्वाती पांडे" यांच्या अध्यक्षते खाली कोहिनूर पार्क प्रभादेवी येथे कार्यक्रम आयोजित केला होता,मी मानद सचिव म्हणून कार्यरत असलेल्या ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेला खास निमंत्रण दिले होते, माझ्या लहानपणा पासून पाहिलेले  पोस्ट ऑफिस आणि पोस्टमन यांची कामगिरी,याचा माझ्या भाषणात उल्लेख केला त्याच बरोबर सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाति समाज व ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेला दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल आदर भाव व्यक्त केला,  ...

गोरगरिबांसाठी शासनातर्फे अल्पदरात दिवाळी भेट

Image
दिवाळीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार सवलतीच्या दराने शिधाजिन्नस संच अलिबाग,दि.14 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटूंब योजनेच्या (PHH) पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त शासनाने नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येक शिधापत्रिकाधारकास 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.      शासनाने रायगड जिल्हयातील 15 तालुक्यातील सर्व शासनमान्य रास्तभाव दुकानांमार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधा जिन्नस संच रु.100/- या दराने वितरीत करण्याचे ठरविले आहे.   जिल्हयातील अंत्योदय अन्न योजनेचे 83 हजार 251 शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटूंब योजनेतील 3 लाख 64 हजार 824 शिधापत्रिकाधारक अशा एकूण 4 लाख 48 हजार 075 शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच कुटूंबांना दिवाळी सणानिमित्त फक्त रु.100/- मध्ये शिधाजिन्नस संच मिळणार आहे.   सध्या खुल्या बाजारात 1 किलो रवा रु.40 ते 50, 1 किलो चणा...

सिडको निर्मित उलवे नोड मध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव.

Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि/ दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ --------------------------------------------- आधुनिक शहरात समावेश असलेल्या सिडको निर्मित उलवे नोड येथे अनेक सुविधांचा अभाव .... --------------------------------------------- जागतिक स्तरावरील आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईचा विकास सिडको महामंडळाने केला आहे.  यामध्ये प्रामुख्याने रेल्वेची लोकल सेवा,  नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा,  लवकरच येऊ घातलेले लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो सेवा, फेरीबोट अशा उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त हे शहर सध्या प्राथमिक सुविधा अभावी चर्चेचा विषय बनला आहे.   येथे उंचच उंच  इमारती उभ्या रहात असताना पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेच्या निर्णयाला तिलांजली दिल्याचे दिसते कारण अनेक सेक्टर वसवल्यानंतर कुठेही सार्वजनिक शौचालयाची सुविधा केलेली नाही त्यामुळे घरातून बाहेर पडलेल्या व्यक्तीला येथे या सुविधेपासून वंचित रहावे लागते. तसेच उलवे नोड मधील  एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इथे स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजास्तव मृतदेह घ...

नवी मुंबई पोलिसांचा गुन्हेगारीला आळा.....

Image
 आवाज कोकणचा/ नवी मुंबई प्रतिनिधी दिनंक १० ऑक्टोबर २२ नवी मुंबईतील कुख्यात विकी उर्फ विक्रांत देशमुख साथीदारांसह गजाआड ------------------------------------------------ नवी मुंबई परिसरात खून, अपहरण, बलात्कार, खंडणीसह इतर जवळपास ३८ गुन्ह्यात सहभाग असलेला कुख्यात गुंड विकी उर्फ विक्रांत देशमुख यास नवी मुंबई पोलिसांनी गोवा येथून शिताफीने अटक केल्यानंतर त्याच्या साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी याबद्दल माहिती दिली.  यावेळी उपायुक्त सुरेश मेंगडे, गुन्हे शाखा, स.पो. नि. जी. डी. घने, स.पो. नि. गंगाधर देवडे यांच्यासह विशेष पथकाने मोलाची कामगिरी करून अनेक गुन्ह्यात हवा असलेल्या या टोळीच्या म्होरक्यासह साथीदारांना पकडण्यात यश आल्याने येथील गुन्हेगारी टोळ्यांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.